PF सोबत EPS मध्येही दर महिन्याला जमा होतात पैसे, किती वर्षे खाजगी नोकरी केल्यावर किती मिळेल पेंशन ?

पीएफ खात्यासोबत कर्मचारी पेंशन योजना ( EPS) या निवृत्ती योजनेत देखील पैसे कंपनी जमा करीत असते, वयाच्या 58 वर्षांनंतर ही पेन्शन मिळत असते.

PF सोबत EPS मध्येही दर महिन्याला जमा होतात पैसे, किती वर्षे खाजगी नोकरी केल्यावर किती मिळेल पेंशन ?
EPS
Image Credit source: socialmedia
| Updated on: Mar 28, 2023 | 5:08 PM

मुंबई : कर्मचारी पेन्शन योजना ( EPS ) एक रिटायरमेंट स्कीम आहे. या याजेनेला EPFO द्वारे चालविले जाते, ईपीएस EPFO तर्फे चालविणारी जाणारी पेंशन योजना आहे. ही योजना संघटीत क्षेत्रातील काम करून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही योजना राबविण्यात येत असते. परंतू या योजनेचा लाभ दहा वर्षे नोकरी केल्यानंतर घेता येतो. ही नोकरी त्याने सलग करायला हवी असे काही बंधन नाही, पीएफ खात्यात जमा रकमेचा एक हिस्सा पेंशन फंडसाठी या ईपीएस खात्यात जात असतो. जर तुमचे पैसे जर EPS साठी सुद्धा पगारातून कापले जात असतील तर 20-25-30 वर्षांची नोकरी केल्यानंतर किती पेंशन मिळेल याची माहीती घेऊया…

EPS योजनेला साल 1995 मध्ये लॉंच केले होते. या योजनेत सध्याचे आणि नविन ईपीएफ सदस्य देखील सामील होऊ शकतात. दर महिन्याला पीएफ खात्यात बेसिक सॅलरी + डीएचे 12 टक्के जमा होते. एम्प्लॉयर / कंपनीचा वाटाही 12 टक्के जमा होतात, कंपनीद्वारे जमा होणाऱ्या रकमेत 8.33 टक्के पैसे कर्मचाऱ्याच्या पेंशन फंडात जातात. आणि बाकी 3.67 टक्के पैसे पीएफ खात्यात जातात.

EPS : पेंशनची काय आहे पात्रता

आपल्याला EPEO चे सदस्य असणे गरजेचे

दहा वर्षे नोकरी केलेली हवी, सलग नसली तरी चालेल

आपण 58 वर्षांचे असाल, तरच पेंशनचा लाभ होतो

50 वर्षांचे झाल्यावर आपण ईपीएसने पैसे काढू शकता

आपण दोन वर्षांसाठी (60 वर्षांचे होईपर्यंत ) आपली पेंशन टाळू शकता, त्यानंतर आपल्याला दरवर्षी चार टक्के दराने पेंशन मिळेल

पेन्शन योग्य वेतन : दर महिन्याला पेन्शन खात्यात जाणारी रक्कम

सध्याच्या नियमाप्रमाणे कोणत्याही कामगाराच्या पगाराचा 8.33 टक्के हिस्सा त्याच्या पेंशन खात्यात जमा होतो, पेंशनसाठी किमान 15 हजार सॅलरी असणे गरजेचे आहे, जर एखाद्याचा वेतन पंधरा हजार आहे,तर 15000 X 8.33 /100 = 1250 रु. दर महिन्याला त्याच्या खात्यात जातील.

कोणाही कर्मचाऱ्याचा EPS मधून बाहेर पडण्यापूर्वी गेल्या 60 महिन्याचे पेंशन योग्य वेतन त्याचे सरासरी मासिक वेतन असते, जर आपण नोकरीच्या अंतिम 60 महिन्यात काही दिवस आपल्या EPS अकाऊंट योगदान केले नसेल, तरीही त्या दिवसांचा लाभ त्याला देण्यात येईल.

पेन्शनसाठी हा आहे फॉर्म्यूला

कर्मचाऱ्याची मासिक पेन्शन = पेन्शन योग्य वेतन X पेन्शन योग्य सेवा /70.

20 वर्षे नोकरीवरील पेन्शन

मासिक पगार  (शेवटच्या 60 महीन्यांचा पगाराची सरासरी ) 15 हजार रुपए आहे आणि नोकरीचा काळ 20 वर्षे….

मासिक पेन्शन : 15000X 20/70 = 4286 रु.

25 वर्षे नोकरी वर पेन्शन

मंथली पेन्शन : 15000X 25/70 = 5357 रु.

30 वर्षे नौकरी वर पेन्शन

मासिक  पेन्शन : 15000X 30/70 = 6429 रु.

कर्मचाऱ्याचा मृत्यु झाल्यावर

कर्मचाऱ्याचे नातेवाईक खालील प्रकरणात पेन्शनचा लाभ घेऊ शकतात

नोकरी करताना कर्मचाऱ्याचा  मृत्यु झाल्यावर एम्प्लॉयर/कंपनीद्वारा कमीत कमी एक महीने त्या कर्मचाऱ्याच्या EPS खात्यात पैसे जमा  केल्यावर

जर कर्मचाऱ्याने 10 वर्षे नोकरी केली आहे, परंतू 58 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी मृत्यू झाल्यास

मासिक पेन्शन सुरू झाल्यावर कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यावर