नवी दिल्ली : देशात मागच्या काही वर्षांत रियल इस्टेट (Real Estate) काहीसा मंदावल्याचं चित्र आहे. त्यात कोरोना महामारीने (Corona Pandemic) तर संपूर्ण देशातल्या रियल इस्टेट उद्योगाला मोठा झटका दिला. गेल्या दीड ते दोन वर्षात या उद्योगाने मोठा तोटा सहन केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण देशात 1 लाख 40 हजार 613 कोटी रुपयांचे हाऊसिंग प्रकल्प (Housing Projects) रखडले आहेत. यामध्ये तब्बल 1.74 लाख फ्लॅट्स आहेत. ही संख्या केवळ देशातल्या 6 प्रमुख शहरांमधली आहे. Anarock च्या एका रिपोर्टमधून ही आकडेवारी समोर आली आहे. या रिपोर्टनुसार, बिल्डरांकडे आपले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पुरेसा निधी नसल्याने हे प्रकल्प रखडले आहेत. (As builders do not have funds to complete the projects, housing projects worth Rs 1 lakh 40 thousand crore are stalled in major cities in India)
सर्वाधिक हाऊसिंग प्रकल्प रखडलेल्या शहरांमध्ये पहिला क्रमांक दिल्ली एनसीआरचा (Delhi NCR) लागतो. त्यानंतर मुंबई (Mumbai), पुणे (Pune), हैदराबाद (Hyderabad), बंगळुरू (Bangalore), कलकत्ता (Calcutta) शहरांचा नंबर आहे. टक्केवारीचा विचार केला तर एकट्या दिल्लीत देशातले 66 टक्के प्रकल्प रखडले आहेत. यामध्ये 1 लाख 13 हजार 860 फ्लॅट्सचं बांधकाम थांबलंय. ज्यांची किंमत 86 हजार 463 कोटींच्या घरात आहे. यामध्ये 50 टक्के मिड सेगमेंट, 24 टक्के अफोर्डेबल सेगमेंट आणि 6 टक्के लक्झरी सेगमेंटमधली घरं आहेत. रिपोर्टनुसार, ज्या ग्राहकांनी घरं बुक केली आहेत त्यांना घरं मिळण्यासाठीही विलंब होत आहे.
मुंबई आणि उपनगरांमध्ये (Mumbai Suburban) 41 हजार 720 फ्लॅट्सचं काम रखडलं आहे. यांची एकत्रित किंमत 42 हजार 417 कोटी रुपये आहे. दिल्ली एनसीआरनंतर MMRDA भागात सर्वाधिक 24 टक्के प्रकल्प रखडले आहेत. यामध्ये 37 टक्के लक्झरी फ्लॅट्स आहेत. या प्रकारातल्या फ्लॅट्ससाठी सर्वाधिक पैसे मोजावे लागतात आणि मुंबईत रखडलेल्या प्रकल्पांमध्ये लक्झरी फ्लॅट्स सर्वाधिक आहेत. यानंतर परवडणाऱ्या घरांच्या प्रकारातले 22 टक्के आणि प्रीमीयम प्रकारातले 21, मध्यम प्रकल्पातले 20 टक्के फ्लॅट्सचं काम बंद पडलं आहे. पुण्याचं चित्र पाहिलं तर पुण्यात सुमारे 10 हजार फ्लॅट्सचं काम थांबलं आहे. यामध्ये बिल्डरांचे 5 हजार 854 कोटी रुपये अडकले आहेत.
पुण्यानंतर हाऊसिंग प्रकल्प रखडलेल्या शहरांच्या यादीतर हैदराबादचा नंबर आहे. हैदराबादमध्ये 2 हजार 727 कोटी रुपयांचे 4 हजार 150 प्लॅट्सचं काम रखडलं आहे. देशाचं आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूमध्ये 3 हजार 879 फ्लॅट्सचं काम थांबलं आहे ज्याची किंमत 3 हजार 61 कोटींच्या घरात आहे. यामध्ये सर्वाधिक घरं ही मध्यम प्रकारातली आहेत. या सर्व शहरांच्या तुलनेत कलकत्ताची स्थिती चांगली आहे. कलकत्त्यात 150 प्रकल्पांचं काम थांबलंय आणि त्याची किंमत 91 कोटी आहे. कलकत्त्यात ज्या फ्लॅट्सचं काम थांबलं आहे त्यांची सरासरी किंमत 80 लाखांच्या घरात आहे. (As builders do not have funds to complete the projects, housing projects worth Rs 1 lakh 40 thousand crore are stalled in major cities in India)
संबंधित बातम्या :