PF | ना नॉमिनी, ना खातेधारक; विना दाव्याचे लाखो अकाउंट, कोट्यावधी रुपये सरकारच्या गंगाजळीत!

| Updated on: Jan 05, 2022 | 7:41 AM

खाते मॅच्युरीटी नंतर 7 वर्षाच्या आत पैसे न काढल्यास ज्येष्ठ नागरिक कल्याण निधीत वर्ग केले जातात. मात्र, पैसे वर्ग करण्यापूर्वी खातेधारकाला कल्पना देणे अनिवार्य ठरते. यासाठी विशिष्ट स्वरुपाची पद्धत निर्धारित करण्यात आली आहे. प्रत्येक वित्तीय वर्षाच्या 30 सप्टेंबर पूर्वी मॅच्युअर खाते धारकांशी संपर्क केला जातो.

PF | ना नॉमिनी, ना खातेधारक; विना दाव्याचे लाखो अकाउंट, कोट्यावधी रुपये सरकारच्या गंगाजळीत!
62 रुपये ज्यादा घेतले म्हणून प्रवाशाला 15 हजारांची भरपाई
Follow us on

नवी दिल्ली : पोस्ट ऑफिसद्वारे अनेक छोट्या गुंतवणूक योजना चालविल्या जातात. भविष्यनिर्वाह निधी (PF) आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) यांचा प्रामुख्याने समावेश होतो. ठेवींच्या सुरक्षिततेसोबत मॅच्युरिटीवेळी सर्वोत्तम रक्कम प्राप्त होते. दरम्यान, पोस्ट ऑफिसचे हजारो सेव्हिंग्स अकाउंट (Saving Account) अद्याप विना क्लेमचे आहेत. खात्यात पैसे जमा आहेत. मात्र, प्रबळ नॉमिनी किंवा क्लेम अभावी पैसे सरकारी खात्यात वर्ग करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

बचत खात्यातील कोट्यावधी रुपये सरकारच्या खात्यात वर्ग करण्याची एकाधिक कारणे आहेत. त्यापैकी समाविष्ट मुख्य कारणे पुढीलप्रमाणे:

  • पॉलिसीधारकाचा अकाली मृत्यू, खात्याला नॉमिनी नसणे
  • काही हफ्त्यानंतर खात्यावर व्यवहार न करणे
  • ज्येष्ठ नागरिकांकडून नॉमिनीला कागदपत्रांचे हस्तांतरण न करणे
  • गुंतवणुकीची कागदपत्रे गहाळ होणे
  • खाते मॅच्युअर वेळी पुरेश्या कागदपत्रांच्या अभावी दावा करण्यास अक्षम

पैसे जातात कुठे?

सरकारकडून विना दाव्याचे पैसे ज्येष्ठ नागरिक कल्याण निधीत वर्ग केले जातात. वर्ष 2016 मध्ये निधीचे गठन करण्यात आले होते. पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांमधील निधी कल्याण निधीत वर्ग केला जातो. पोस्ट ऑफिस बचत खाते, आवर्ती ठेव खाते, मुदत ठेव खाते, मासिक उत्पन्न खाते, ज्येष्ठ नागरिक बचत योजना खाते, किसान विकास पत्र आणि सुकन्या समृद्धी यामधील विन्या दाव्याच्या खात्यातील रकमा ज्येष्ठ नागरिक कल्याण निधीत वर्ग केल्या जातात.

नियम काय सांगतो?

खाते मॅच्युरीटी नंतर 7 वर्षाच्या आत पैसे न काढल्यास ज्येष्ठ नागरिक कल्याण निधीत वर्ग केले जातात. मात्र, पैसे वर्ग करण्यापूर्वी खातेधारकाला कल्पना देणे अनिवार्य ठरते. यासाठी विशिष्ट स्वरुपाची पद्धत निर्धारित करण्यात आली आहे. प्रत्येक वित्तीय वर्षाच्या 30 सप्टेंबर पूर्वी मॅच्युअर खाते धारकांशी संपर्क केला जातो. खात्याच्या स्थितीविषयी फोन, पत्रव्यवहार किंवा ई-मेलद्वारे थेट संपर्क साधला जातो. सर्व विहित प्रक्रिया करुनही खातेधारकाने संपर्क न केल्यास पैसे ज्येष्ठ नागरिक कल्याण निधीत वर्ग केले जातात.

स्वयं-पडताळणीची प्रक्रिया

तुमचे किंवा तुमच्या निकटवर्तीयांचे विना दाव्याचे खाते असल्यास तुम्ही स्वयं-पडताळणी करू शकतात. भारतीय पोस्टाच्या संकेतस्थळावर सर्व प्रक्रिया ऑनलाईन उपलब्ध आहे. तुम्हाला संबंधित सेक्शनमध्ये जाऊन राज्यनिहाय यादी शोधावी लागेल. राज्याच्या यादीत संबंधित खात्यात तुम्ही नाव किंवा खाते क्रमांकासह तपशीलाची पडताळणी करू शकतात. तुम्ही स्वयं-पडताळणी नंतर पैसे काढण्याच्या प्रक्रियेला आरंभ करू शकतात.

कामाच्या इतर बातम्या –

काय सांगता विना इंटरनेट पाठवता येतील पैसे !, एकावेळी 200 रुपये तर एकूण 2000 रुपयांचा करता येईल व्यवहार

घर स्वप्नांचं : निवड तुमची, शिफारस तज्ज्ञांची; गृह कर्ज की होम फायनान्स?

LIC स्वस्तात मस्त पॉलिसी: 28 रुपयांची बचत, 2 लाखांचा लाभ; जाणून घ्या फायदे