चुकूनही हा नंबर डायल करू नका, अन्यथा फसवणुकीला बळी पडलाच समजा

Online Scam : दूरसंचार विभागाने लोकांना सतर्क केले आहे. लोकांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे. लोकांना फोन करुन गंडा घातला जात आहे. कॉल फॉरवर्ड करण्यासाठी त्यांच्या मोबाइल फोनची सेटिंग्ज तपासण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही देखील सावध व्हा आणि इतरांना ही सावध करा.

चुकूनही हा नंबर डायल करू नका, अन्यथा फसवणुकीला बळी पडलाच समजा
Follow us
| Updated on: Jan 13, 2024 | 7:07 PM

Online Fraud : सध्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. अनेकांची वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक केली जात आहे. यातच आता भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने (DOT) गुरुवारी अज्ञात फोन कॉल्सबद्दल युजर्सना एक सल्ला जारी केला. यामध्ये देशातील कोट्यवधी मोबाईल वापरणाऱ्या लोकांना सतर्क करण्यात आले आहे. दूरसंचार विभागाने लोकांना अशा इनकमिंग कॉल्सपासून सावध राहण्यास सांगितले आहे. फोनवर जर तुम्हाला ‘स्टार 401 हॅशटॅग’ (*401#) डायल केल्यावर एक अनोळखी नंबर येतो. पण कॉल करण्यास सांगितले जाते. हे स्कॅमरना सर्व संबंधित वापरकर्त्यांच्या इनकमिंग कॉल्समध्ये प्रवेश करण्यास अनुमती देते आणि फसवणूकीसाठी वापरली जाऊ शकते.

*401# डायल करु नका.

जर एखाद्या यूजरने ‘*401#  डायल केल्यानंतर अनोळखी नंबरवर कॉल केला, तर यूजरच्या मोबाईलवर आलेले सर्व कॉल कॉल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या फोनवर ‘फॉरवर्ड’ केले जातात. याला कॉल फॉरवर्डिंग स्कॅम म्हणतात. आजकाल अशा फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

दूरसंचार विभागाने लोकांना अशा फसवणुकीपासून सावध केले आहे. सोबतच सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. ‘स्टार 401 हॅशटॅग’ डायल करण्यास सांगितले जाते असे फोन लगेचच कट करावे. हा फसवणुकीचा नवा प्रकार आहे. ज्यामुळे आपले सर्व कॉल हे दुसऱ्या नंबरवर फॉरवड केले जातात. ज्यामुळे तुमच्या बँक खात्यातली रक्कम लंपास केली जाऊ शकते.

वेगवेगळे कारणे सांगून तुम्हाला तो नंबर डायल करायला लावला जातो. सिम कार्डमध्ये समस्या,  नेटवर्कची समस्या असे वेगवेगळे कारण सांगितले जातात. त्यानंतर ग्राहकाला समस्येचे निराकरण करण्यासाठी हा  कोड डायल करण्यास सांगितले जातो. त्यानंतर मोबाइल नंबर येतो. हे पूर्ण झाल्यानंतर, संबंधित मोबाइल नंबरवर बिनशर्त कॉल ‘फॉरवर्डिंग’ सुरू होते.

फोन फॉरवर्डिंग करुन फसवणूक

जेव्हा लोकांचे कॉल अनोळखी मोबाइल नंबरवर फॉरवर्ड होऊ लागतात, तेव्हा ते स्कॅमरना सर्व इनकमिंग कॉलमध्ये प्रवेश करू देते. या माध्यमातून ते लोकांची फसवणूक करतात.

दूरसंचार विभागाने म्हटले आहे की, दूरसंचार सेवा प्रदाते कधीही त्यांच्या ग्राहकांना ‘स्टार 401 हॅशटॅग’ डायल करण्यास सांगत नाहीत. लोकांना कॉल फॉरवर्डिंगसाठी त्यांच्या मोबाईल फोनची सेटिंग्ज तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि जर ‘स्टार 401 हॅशटॅग’ डायल करून कॉल फॉरवर्ड करण्याची सुविधा दिली असेल तर ती त्वरित बंद करावी.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.