आता व्हाट्सॲपच्या ‘या’ नव्या चॅटबॉक्सद्वारे मिळवा हेल्थ टिप्स्‌

| Updated on: Apr 10, 2022 | 4:53 PM

हेल्थ टिप्स तसेच आरोग्यविषयक प्रश्‍न विचारण्यासाठी व्हाट्सअपतर्फे एक चॅटबॉक्स लाँच केला आहे. 'Ask RAKSHA' या नव्या चॅटबॉक्सची घोषणा टीएचआईपी मीडियाने केली असून विविध अफवांची पडताळणी करण्यासाठी हा एक नवा फॅक्ट चेकिंग प्लॅटफॉर्म ठरणार आहे.

आता व्हाट्सॲपच्या ‘या’ नव्या चॅटबॉक्सद्वारे  मिळवा हेल्थ टिप्स्‌
Image Credit source: Wikipedia
Follow us on

भारतात मोठ्या प्रमाणात व्हाट्सॲपचा (WhatsApp) वापरकर्ता वर्ग आहे. संदेशवहनासाठी आज व्हाट्सअपचा सर्वाधिक वापर केला जात आहे. त्यामुळे अनेकदा व्हाट्सॲपद्वारे काही चुकीचे संदेश किंवा अफवा पसरवल्या जात असतात. त्यामुळे यातून अनेकदा सामाजिक शांततादेखील भंग पावत असते. राजकीय, आरोग्य, (Health) रोजच्या जगण्याशी संबंधित विविध माहिती व्हाट्सॲपद्वारे पुढे पाठवली जात असते. त्यामुळे पाठविण्यात आलेली माहिती किती खरी व किती खोटी? हे जाणून घेण्यासाठी कंपनीने मागील काळात काही फॅक्ट चेकर्सची तरतुद केली होती. आता आरोग्याशी निगडीत माहितीची पडताळणी करण्यासाठी कंपनीने एक चॅटबॉक्सची (chatbox) निर्मिती केली आहे. ‘Ask RAKSHA’ या नव्या चॅटबॉक्सची घोषणा टीएचआईपी मीडियाने केली असून हा एक नवा फॅक्ट चेकिंग प्लॅटफॉर्म आहे.

आरोग्य, आजार, उपचार आदींबाबत चुकीच्या अफवा पसरवणार्या बातम्या तसेच दाव्यांची पडताळणी करण्याचे काम टीएचआईपी मीडिया, इंटरनेशनल फॅक्ट चेकिंग नेटवर्क व्हेरिफाईड मेडिकल प्रोफेशनलला सोबत घेउन करीत असते. इंग्रजी, हिंदी, बंगाली, पंजाबी, गुजराती व नेपाळी अशा विविध भाषांमध्ये यांचा अहवाल प्रसिध्द केला जात असतो. दरम्यान, रेडीली अक्सेसिबल नॉलेज अँड सपोर्ट फॉर हेल्थ ऐक्शन असा रक्षा या शब्दाचा अर्थ आहे. हा चॅटबॉक्स बिझनेस प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आला आहे. याचा वापर कुठल्याही भारतीय नागरिकाला आरोग्य विषयक फॅक्ट चेकिंग करण्यासाठी करता येणार आहे. हे फॅक्ट चेकिंग पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे. याशिवाय व्हाट्सअपचे वापरकर्ते आपल्या आरोग्यविषयक प्रश्‍न किंवा शंका या प्लॅटफॉर्मवरुन विचारुन त्याचे समाधान करु शकणार आहेत. सामान्य ज्ञानासाठी यावर काही क्विजदेखील खेळता येणार आहेत. सध्या हा चॅटबॉक्स केवळ इंग्रजी माध्यमात असला तरी कंपनीने लवकरच त्याला हिंदी आणि बंगाली व्हर्जनमध्ये आणण्याचे नियोजनदेखील केले आहे.

दरम्यान, चॅटबॉक्सचा वापर आणि रक्षासोबत आपले प्रश्‍न विचारण्यासाठी युजर्सना +91-8507885079 या नंबरवर Hi पाठवावे लागेल. व्हाट्सअप इंडियाचे पब्लिक पॉलिसी डायरेक्टर शिवनाथ ठुकराल यांनी सांगितले की, ‘रक्षा’ लाँच झाल्याचे आपल्याला समाधान वाटत आहे. या चॅटबॉक्सच्या माध्यमातून वापरकर्त्यांना त्यांच्या आरोग्याशी संबंधित सर्व वास्तवतावादी माहिती मिळण्यास मदत होईल. तसेच लोक आपले आरोग्याचे प्रश्‍न या चॅटबॉक्सच्या माध्यमातून विचारुन घरात बसून आपल्या शंकांचे समाधान करु शकणार आहेत.  ठुकराल पुढे म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून आम्ही विविध एनजीओ तसेच सरकारकडेही याबाबत पाठपुरावा करत होतो. लोकांना वास्तवावर आधारीत आरोग्याशी निगडीत प्रश्‍नांची उत्तरे मिळावीत, यासाठी प्रयत्न केल्याचेही त्यांनी सांगितले.

Video Chandrapur tiger | चंद्रपुरातल्या गोसेखुर्द कालव्यात वाघाचं बस्तान, गर्मीपासून बचावासाठी केली युक्ती

SRH vs GT Playing XI IPL 2022: हैदराबदचे 11 महारथी गुजरातचा विजयरथ रोखण्यासाठी सज्ज!

भाजपने बनावट हिंदू ह्रदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका