AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SRH vs GT Playing XI IPL 2022: हैदराबदचे 11 महारथी गुजरातचा विजयरथ रोखण्यासाठी सज्ज!

मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर शनिवारी सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) गुणतालिकेत आपलं खातं उघडलं. चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून त्यांनी आयपीएल-2022 मध्ये (IPL 2022) पहिला विजय मिळवला. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील या संघाचा तीन सामन्यांतील हा पहिला विजय ठरला.

SRH vs GT Playing XI IPL 2022: हैदराबदचे 11 महारथी गुजरातचा विजयरथ रोखण्यासाठी सज्ज!
SRH vs GT Playing XI IPL 2022Image Credit source: IPL
| Updated on: Apr 10, 2022 | 5:56 PM
Share

मुंबई : मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर शनिवारी सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) गुणतालिकेत आपलं खातं उघडलं. चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून त्यांनी आयपीएल-2022 मध्ये (IPL 2022) पहिला विजय मिळवला. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील या संघाचा तीन सामन्यांतील हा पहिला विजय ठरला. चेन्नईचा या मोसमातील चौथा पराभव केला. या सामन्यात सनरायझर्सची फलंदाजीही चालली आणि गोलंदाजीही. आता या स्पर्धेतील सर्वोत्तम संघांपैकी एक असलेल्या गुजरात टायटन्सचं (Gujarat Titans) हैदराबादसमोर मोठं आव्हान असेल. गुजरात या मोसमातून आयपीएलमध्ये पदार्पण करत आहे आणि सध्या हा संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. हा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. या संघाने या हंगामात आतापर्यंत तीन सामने खेळले असून तिन्ही जिंकले आहेत.

सनराजर्सविरुद्ध गुजरातला विजयी फॉर्म कायम ठेवायचा आहे. पंजाबविरुद्ध गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने दोन खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली. साई सुदर्शन आणि दर्शन नळकांडे यांनी शेवटच्या सामन्यात पदार्पण केले. साई सुदर्शनने आपल्या फलंदाजीने खूप प्रभावित केले होते आणि त्यामुळे त्याचे संघात राहाणे स्वाभाविक आहो. दुसरीकडे, कर्णधार पंड्या दर्शनला आणखी एक संधी देऊ शकतो. दुसरीकडे मॅथ्यू वेड अजून काही विशेष करू शकलेला नाही. त्यामुळे त्याच्या जागी अफगाणिस्तानच्या रहमानउल्ला गुरबाजला संधी मिळू शकते. तो यष्टिरक्षक आहे आणि तुफानी फलंदाजीसाठी ओळखला जातो

सनरायझर्स संघात कोणताही बदल होणार नाही!

दुसरीकडे, सनरायझर्सच्या संघाकडे पाहिले तर चेन्नईविरुद्ध त्यांनी दोन बदल केले होते. दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज मार्को यान्सन संघात आला. त्याचवेळी शशांक सिंगलाही संधी मिळाली. शशांकला या सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याला या सामन्यात बाहेर बसवलं जाणार नाही. दरम्यान, अभिषेक शर्माने शानदार अर्धशतक झळकावून संघातील आपले स्थान पक्के केले आहे. अशा स्थितीत या संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता नाही.

सनरायझर्स हैदराबादची प्लेईंग इलेव्हन

केन विल्यमसन (कर्णधार) अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, मार्को यान्सन, उमरान मलिक, टी. नटराजन.

गुजरात टायटन्सची प्लेईंग इलेव्हन

हार्दिक पंड्या, रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), शुभमन गिल, साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, रशीद खान, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, दर्शन नळकांडे.

इतर बातम्या

RCB vs MI, IPL 2022 : सूर्यकुमारने एकट्याने RCBला शांत केलं, अर्धशतक ठोकले

Ravindra Jadeja : रवींद्र जडेजाने मैदानात उतरताच केला मोठा विक्रम, धोनी आणि रैनाच्या यादीत समावेश

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.