Kolhapur | भाजपने बनावट हिंदू ह्रदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा रोख राज ठाकरेंकडे?

कोल्हापूरमधील पोटनिवडणुकीसंदर्भात आयोजित ऑनलाइन सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला.

Kolhapur | भाजपने बनावट हिंदू ह्रदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा रोख राज ठाकरेंकडे?
उद्धव ठाकरे यांची भाजपावर टीका Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 5:12 PM

कोल्हापूर | देशात भाजपाने बनावट हिंदू हृदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो फसला, लोकांनी झिडकरला. हिंदू हृदयसम्राट म्हणल्यावर नाव आणि चेहरा एकच येतो, तो म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)… त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी ते होऊ शकत नाहीत. हिंदू अडचणीत असताना घरी बसणारे आणि नंतर त्यावर प्रतिक्रिया देणारे हे प्रतिक्रिया सम्राट होऊ शकतात, पण हिंदुसम्राट होऊ शकत नाहीत, असा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेकडून हिंदुत्वाचे मुद्दे बाजूला पडत आहेत, अशी टीका सातत्याने केली जात आहे. तसेच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीदेखील हिंदुहृदय सम्राट या नावाने पोस्टरबाजी केली होती. हिंदुत्वाचाच मुद्दा उचलून धरत, राज ठाकरे यांनी मशीदीतून भोंग्यांवर नमाज पठण करायचे असेल तर मंदिरातूनही हनुमान चालीसा भोंग्यांवर लावण्यात यावे, असे आवाहन केले होते. भाजपनेही या मुद्द्याला चांगलीच हवा दिली. या सर्व हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता, भाजपाने उभा केलेला बनावट हिंदुहृदय सम्राट लोकांनी झिडकारयलाय, असं स्पष्ट शब्दात सांगितलं.

फडणवीसांच्या आरोपांवर पलटवार

कोल्हापूर उत्तर मतदार संघातील पोटनिवडणुकीसंदर्भात आयोजित ऑनलाइन सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती. हिंदुहृदय सम्राटांनी निर्माण केलेली शिवसेना आता राहिलेली नाही, असा आरोप नुकतात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांनी केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाचा समाचार घेतला. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. भाजपाची साथ सोडली म्हणजे हिंदुत्व सोडलं नाही. भाजपासारखी आम्ही छुपी युती करत नाही, आम्ही समोरून वार करतो.

पूर्वी बाळासाहेबांचा.. आता सोनियाजींचा फोटो…

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरमध्ये बोलताना शिवसेनेवर टीका करताना म्हटले होते की, पूर्वी मुख्यमंत्री कार्यालयात पूर्वी बाळासाहेबांचा फोटो असायचा. आता सोनियाजींचा फोटो असतो. यावर उद्धव ठाकरे यांनी सडेतोड प्रतिक्रिय दिली. ते म्हणले, फक्त बाळासाहेब ठाकरेंचाच नव्हे. अटलजींचाही फोटो होता. नरेंद्र मोदींचाही फोटो होता. तुम्ही ही परिस्थिती निर्माण केली. तुम्हाला जर हिंदुहृदय सम्राटांबद्दल प्रेम असेल तुम्हीच त्यांच्या नावासमोर जनाब असं लावण्याचा नीच प्रयत्न केला होता. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या एका खोलीत तुम्ही अमित शहांनी मला दिलेले वचन का पाळले नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.

मग हिंदुहृदय सम्राटांचं नाव देण्यास विरोध का?

भाजपचे हिंदूहृदय सम्राटांवर एवढंच प्रेम असेल तर नवी मुंबई विमानतळाला त्यांचं नाव देण्यास भाजपाचा एवढा विरोध कशासाठी आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गालाही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे नाव महाविकास आघाडी सरकारनी दिलं. ते काम आम्हाला करावं लागलं.

नकली भगवा बुरखा फाडयला पाहिजे- मुख्यमंत्री

भाजपने भगव्यावरून सुरु केलेल्या राजकारणावर टीका करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘ छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे तो भगवा? तुमच्या सोयीप्रमाणे त्याच्यामागे निळा, काळा, हिरवा लावाल आणि म्हणाल तर तो भगवा आम्ही स्वीकारणार नाही. अस्सल भगवा शिवरायांचा, साधुसंतांचा आणि वारकऱ्यांचा आहे. याला दुसरा कोणताही रंग लागलेला नाहीये..

इतर बातम्या-

बाळासाहेबांचा आदर आहे म्हणता तर शहांनी दिलेला शद्ब का पाळला नाही; उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल

Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding : “मी आलियाचा हुंडा म्हणून तिच्या सासरी जाणार”, रणबीर-आलियाच्या लग्नात राखी सावंतची लगबग

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.