Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding : “मी आलियाचा हुंडा म्हणून तिच्या सासरी जाणार”, रणबीर-आलियाच्या लग्नात राखी सावंतची लगबग

राखी सावंत तिच्या विविध विधानांसाठी विशेष चर्चेत असते. आताही रणबीर आलियाच्या लग्नात राखी सावंतची लगबग पाहायला मिळतेय. मी आलियाचा हुंडा म्हणून जाणार आहे, असं राखी म्हणाली आहे.

Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding : मी आलियाचा हुंडा म्हणून तिच्या सासरी जाणार, रणबीर-आलियाच्या लग्नात राखी सावंतची लगबग
रणबीर कपूर-आलिया भट आणि राखी सावंत
आयेशा सय्यद

|

Apr 10, 2022 | 4:57 PM

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) ही बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असणारी जोडी. ते दोघे एकत्र दिसले तरी त्याची चर्चा होते. सध्या या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. लवकरच लग्नबंधनात हे दोघे (Ranbir Alia Wedding) अडकणार आहे. रणबीर आणि आलियाने (Ranbir-Alia) लग्नाबाबत अद्याप कोणतीही माहिती दिली नसली तरी 13 ते 17 एप्रिलदरम्यान हे दोघं लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जात आहे. मुंबईतील चेंबूर इथल्या आर. के. बंगल्यावर (RK House) मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित रणबीर-आलिया लग्न करतील, अशी माहिती आहे. या लग्नात आपण हुंडा म्हणून आलियासोबत जाणार असल्याचं अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) हिने म्हटलंय. तिच्या या विधानाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

राखी सावंत काय म्हणाली?

राखी सावंत तिच्या विविध विधानांसाठी विशेष चर्चेत असते. आताही रणबीर आलियाच्या लग्नात राखी सावंतची लगबग पाहायला मिळतेय. मी आलियाचा हुंडा म्हणून जाणार आहे, असं राखी म्हणाली आहे. “आलियासाठी यंदाचे वर्ष फारच चांगलं आहे. तिचा गंगुबाई काठियावाडी सिनेमा सुपरहिट ठरला. शिवाय आरआरआर या हजार कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या सिनेमातही तिची महत्वाची भूमिका होती. त्यानंतर आता ती विवाहबंधनात अडकणार आहे. शिवाय ती हॉलिवूड चित्रपटही करणार असल्याचं कळतंय. त्यामुळे मी तर ठरवलं आहे की मी हुंडा म्हणून तिच्यासोबत तिच्या सासरी जाणार आहे. हवंतर मी तिच्या बॅगेत बसून जाईन”, असं राखी सावंत म्हणाली आहे. तिच्या या विधानाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

आलिया आणि रणबीर यांच्या लग्नसोहळ्याला अयान मुखर्जी, करण जोहर, आदित्य रॉय कपूर, विकी कौशल, कतरिना कैफ, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण उपस्थित असणार असल्याचं कळतंय. रणबीर-आलियाने नुकतंच त्यांच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. त्यानंतरच्या प्रोजेक्ट्ससाठी होणाऱ्या शूटिंगच्या तारखाही त्यांनी लग्नसोहळ्याच्या हिशोबाने ठरवल्या असल्याचं समजतंय.

आलियाने काही वेळापूर्वी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. यात ब्रह्मास्त्र या सिनेमातील तिचा आणि रणबीरचा पोस्टर फोटो तिने शेअर केलाय.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें