Gold : ‘मार्केटचं काय खरं नाय, तू सोन्यात गुंतव’ तुम्हालाही असाच सल्ला मिळतोय? थांबा, फायदे-तोटे जाणून घ्या

| Updated on: May 15, 2022 | 9:57 AM

Gold Investment : कागदी सोनं ही सोन्यातील गुंतवणुकीत एक विश्वासू आणि फायदेशीर पद्धत आहे. या सोनं फक्त कागदावर मिळतं.

Gold : मार्केटचं काय खरं नाय, तू सोन्यात गुंतव तुम्हालाही असाच सल्ला मिळतोय? थांबा, फायदे-तोटे जाणून घ्या
सोन्यात गुंतवणूक कशी करावी?
Image Credit source: wallpaperflare.com
Follow us on

मुंबई : शेअर बाजारात (Share Market) चढउतार काय आहेत. अशा वेळी गुंतवणूक नेमकी कुठे आणि कशी करावी, याबाबत संभ्रम निर्माण होतो. अशा संभ्रम निर्माण करणाऱ्या प्रसंगीही सोन्यामध्ये गुंतवणूक (Gold Investment) करण्याचा सल्ला जाणकारांकडून दिला होता. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, 15 टक्के गुंतवणूक सोन्यामध्ये करणं योग्य आहे, असं सांगितलं जातं. आता सोन्यात गुंतवणूक करायची म्हणजे नेमकं काय करायचं? दागिने खरेदी करायचे का? की ठोस सोनं खरेदी करायचं? की डिजिटील सोन्यात (Gold Options) गुंतवणूक करायचं? यापैकी नेमका कोणता पर्याय निवडायचा, हे ठरवणंही तितकंच गरजेचंय. वाढत्या महागाईच्या काळात सोन्यातली गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरु शकते, असा सल्ला दिला जातो. त्या अनुशंगानं सोन्यामधील गुंतवणुकीतील फायदे-तोटे दोन्हीही समजून घ्यायला हवेत. शेअर बाजारात सात टक्के घसरण नोंदवण्यात आली आहे. अशा स्थितीमध्ये सोन्याची गुंतवणूक कशी आणि कुठे व्हावी हे जाणून घेऊयात.

ठोस सोनं… दागिने, नाणी

भारताता सर्रास दागिने आणि नाणी घेत सोन्यात गुंतवणूक केली होती. या प्रकारच्या गुंतवणुकीवर ग्राहकांचा सगळ्यात जास्त विश्वास आहे. एक तर अशाप्रकारे केलेल्या गुंतवणुकीचे दोन फायदे असतात. एक तर दागिन्यांमधील गुंतवणूक ही सुरक्षित मानली जाते. तसंच दागिन्यांचा वापरही पर्यायानं करता येतो. तर दुसरीकडे नाणी खरेदी केल्या, त्यांची थे विक्रीही गरजेच्या वेळी करता येते. दागिने आणि नाणी यांच्यात गुंतवणूक केल्यास, गरजेच्या वेळी त्या तारण ठेवून कर्जही काढता येऊ शकतं. पण जाणकारांच्या सल्ल्यानुसार, दागिने किंवा सोन्याची नाणी गुंतवणुकीसाठी तितकीशी फायदेशीर नाहीत.

दागिने खरेदी करताना त्यावर मजुरी आणि इतर कर आकारला जातो. यात अतिरीक्त पैसे खर्च करावे लागतात. शिवाय नाणी खरेदी केल्यानंतर ती जपून ठेवणं, सांभाळणं, हे देखील तितकंच जिकरीचं काम असतं. या सगळ्यासोबतच सोन्याच्या शुद्धतेचाही मुद्दा महत्त्वाची भूमिका पार पाडतो.

हे सुद्धा वाचा

कागदी सोनं…

कागदी सोनं ही सोन्यातील गुंतवणुकीत एक विश्वासू आणि फायदेशीर पद्धत आहे. या सोनं फक्त कागदावर मिळतं. प्रत्यक्ष सोनं मिळत नाही. पण सोन्यातील गुंतवणुकीशी संबंधित सर्व फायदे याद्वारे मिळतात. गोल्ड एक्स्चेंज फंड आि सुवर्ण रोख यांचा समावेश होतो. अनेक तज्ज्ञ मंडळी याप्रकारच्या सोन्यातील गुंतवणुकीचा सल्ला देतात. घरात दागिन्यांची गरज नसेल, तर याप्रकारच्या सोन्याच्या गुंतवणुकीचा पर्याय विचारात घ्यायला हरकत नाही.

डिजिटल सोनं…

डिजिटल सोनं हे सॉलिड गोल्ड आणि पेपर गोल्ड यांचं मिश्रण असतं. गुगल पे सारखे अनेक ई-पेमेंट प्लॅटफॉर्म डिजिटल सोन्यातील गुंतवणुकीचा पर्याय देतात. अत्यंत कमी दरात सोन्यात गुंतवणूक करु इच्छिणाऱ्यांसाठी हा पर्याय फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं.

या पर्यायत तुम्हाला सोनं खरेदीसोबत विक्रीचीही सुविधा मिळतेय. शिवाय या सोन तयार करण्याचे म्हणजे मजुरीचे पैसे द्यावे लागत नाहीत. खरेदी किंमत ही विक्री किंमतीपेक्षा 3 ते 6 टक्के कमी असते. त्यामुळे हा पर्यायदेखील महत्त्वाचा आणि फायदेशीर मानला जातो.