EPFO: पीएफच्या व्याजाचे पैसे खात्यात जमा, पैसे कसे काढाल?

| Updated on: Nov 04, 2021 | 11:13 AM

EPFO | वैद्यकीय खर्चासाठी वेळी EPF मधून पैसे काढू शकता, परंतु ते वैद्यकीय बिल जमा केल्यानंतर उपलब्ध होते. त्याचवेळी, नवीन वैद्यकीय आगाऊ सेवा पूर्वीच्या प्रणालीपेक्षा वेगळी आहे. यामध्ये तुम्हाला कोणतेही बिल भरावे लागणार नाही. तुम्हाला फक्त अर्ज करायचा आहे आणि तीन दिवसांऐवजी आता फक्त 1 तासात पैसे तुमच्या खात्यात ट्रान्सफर केले जातील.

EPFO: पीएफच्या व्याजाचे पैसे खात्यात जमा, पैसे कसे काढाल?
पीएफ अकाऊंट
Follow us on

नवी दिल्ली: दिवाळीपूर्वी पीएफचे व्याज ईपीएफओने भविष्य निर्वाह निधी (पीएफ) च्या ग्राहकांना हस्तांतरित करणे सुरू केले आहे. तुम्हालाही सणापूर्वी पीएफचे पैसे काढायचे असतील तर आम्ही तुम्हाला पीएफ अॅडव्हान्स काढण्याची मुभा आहे. आता तुम्ही तुमच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून (EPF) एक लाख रुपये आगाऊ काढू शकता. कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही हे पैसे काढू शकता.

वैद्यकीय खर्चासाठी वेळी EPF मधून पैसे काढू शकता, परंतु ते वैद्यकीय बिल जमा केल्यानंतर उपलब्ध होते. त्याचवेळी, नवीन वैद्यकीय आगाऊ सेवा पूर्वीच्या प्रणालीपेक्षा वेगळी आहे. यामध्ये तुम्हाला कोणतेही बिल भरावे लागणार नाही. तुम्हाला फक्त अर्ज करायचा आहे आणि तीन दिवसांऐवजी आता फक्त 1 तासात पैसे तुमच्या खात्यात ट्रान्सफर केले जातील.

पीएफ खात्यातून पैसे कसे काढाल?

* यासाठी तुम्हाला सर्वप्रथम epfindia.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
* वेबसाइटच्या होम पेजवर उजव्या कोपर्‍यात सर्वात वरती ऑनलाइन अॅडव्हान्स क्लेम वर क्लिक करा.
* त्यानंतर unifiedportalmem.epfindia.gov.in/memberinterface वर जा.
* ऑनलाइन सेवांवर जा. यानंतर दावा फॉर्म 31, 19, 10 सी आणि 10 डी भरा.
* तुमच्या बँक खात्यातील शेवटचे ४ अंक टाका आणि पडताळणी करा.
* Proceed for Online claim वर क्लिक करा.
* ड्रॉप डाऊनमधून पीएफ अॅडव्हान्स निवडा.
* पैसे काढण्याचे कारण निवडा. रक्कम प्रविष्ट करा आणि चेकची स्कॅन कॉपी अपलोड करा. मग तुमचा पत्ता टाका.
* Get Aadhaar OTP वर क्लिक करा आणि आधार लिंक केलेल्या मोबाईलवर मिळालेला OTP टाका.
* हे तुमचा दावा दाखल करेल. एका तासात तुमच्या खात्यात पीएफ क्लेमचे पैसे येतील.

पीएफ खात्यामध्ये पैसे आले नाहीत तर काय कराल?

आतापर्यंत अनेक खातेदारांना व्याजाचे पैसे मिळालेले नसून लवकरच त्यांच्या खात्यात पैसे येतील अशी अपेक्षा आहे. वास्तविक, व्याजाची रक्कम झोननिहाय क्रेडिट असल्याने, अनेक वेळा वेगवेगळ्या झोनमध्ये पैसे जमा होण्यास वेळ लागतो. 2020-21 या आर्थिक वर्षासाठी पीएफवर 8.5 टक्के व्याज हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला सरकारने यापूर्वीच हिरवा कंदील दाखवला होता. या निर्णयाला कामगार मंत्रालयानेही संमती दिली होती. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही मिस्ड कॉलद्वारे तुमची ईपीएफ बॅलन्स देखील जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011-22901406 वर मिस्ड कॉल करावा लागेल.

इतर बातम्या:

पोस्टाच्या योजनेत पैसे डबल होणार, 2 लाख रुपये गुंतवा आणि मॅच्युरिटीवेळी 4 लाख मिळवा

EPFO Alert: नोकरी सोडल्यानंतर घरबसल्या ईपीएफओला तारीख अपडेट कशी कराल, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Petrol Diesel Price: दिवाळीच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या भावात घसरण, जाणून घ्या आजचा दर