जनधन योजनेत हस्तांतरित करा तुमचे जुने खाते आणि मोफत मिळवा ‘या’ दहा सुविधा

| Updated on: Apr 28, 2022 | 8:52 AM

संयुक्तरित्या पती-पत्नीचे जनधन खाते उघडले असेल तर दोघांना एक लाखांचा अपघाती विमा आणि 30 हजार रुपयांचा जीवन विम्याचा लाभ मिळतो. दोघांना रक्कम मिळते. दोघांपैकी एकाला ओव्हरडॉफ्टची सुविधा मिळते. 5 हजार रुपयांपर्यंत ही सुविधा असते

जनधन योजनेत हस्तांतरित करा तुमचे जुने खाते आणि मोफत मिळवा या दहा सुविधा
Image Credit source: TV9
Follow us on

जनधन खाते योजना (Jan dhan Yojana) सरकारची खास योजना आहे. यामुळे देशातील गरीबातील गरीब कुटुंबाला बँकिंग सेवा सुविधा प्राप्त होतात. त्यासाठी सरकारने मध्यंतरी खास ड्राईव्ह पण राबविला होता. तसेच बँकांना जनधन योजनांवर लक्ष्य केंद्रित करण्याचे निर्देशही दिले होते. जनधन योजनेतंर्गत अनेक प्रकारच्या सुविधा अगदी मोफत (Free Account Facilities) मिळतात. या अशा सोयी-सुविधा आहेत, ज्यासाठी सर्वसाधारणपणे बँकांना मोठ्या प्रमाणात शुल्क अदा करावे लागते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे खाते जनधन योजनेत हस्तांतरीत (Account Transfer) केले तर या सुविधा तुम्हालाही ग्राहक म्हणून प्राप्त होतील, विशेष म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे या सुविधा निशुल्क असतील. जर तुमचे बँकेत अगोदरच बचत खाते असेल तर ते जनधन खात्यात सहज हस्तांतरीत करता येईल. जन धन खात्यात बचत खाते हस्तांतरीत करण्यासाठी तुमच्याकडे रुपे कार्ड असणे आवश्यक आहे. नसेल तर तुम्हाला त्यासाठी अर्ज करावा लागेल. त्यानंतर खाते सहज हस्तांतरीत होईल.

झिरो बॅलन्सची सुविधा

अनेक बँकांनी त्यांच्या खात्यात मासिक शिल्लकीची मर्यादा घालून दिली आहे, म्हणजे एवढे बॅलन्स तुमच्या खात्यात असायलाच हवे, अन्यथा त्यावर बँक दंड आकारणार. त्यामुळे अनेकदा पैशांची चणचण भासल्यावर आपल्याला रक्कम असूनही त्याचा वापर करता येत नाही. अशावेळी जनधन योजनेतंर्गत तुम्ही हे बचत खाते हस्तांतरीत करु शकता. त्यासाठी तुमच्याकडे रुपे कार्ड असणे आवश्यक आहे. रुपे कार्ड असेल तर पंतप्रधान जन धन योजनेतंर्गत जीवन विम्याची सुरक्षा आणि अपघाती विम्याचा लाभ सहजरित्या मिळेल. खाते हस्तांतरीत केल्यानंत तुम्हाला ओव्हरड्राफ्टची सुविधा ही प्राप्त होईल. यासाठी फक्त एक महत्वाची बाब लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे तुमचे सध्याचे खाते कर्जमुक्त असावे. तुम्ही बँकेचे थकीत कर्जदार नसावेत.

चला तर सुविधांचा आढावा घेऊयात

  1.  कुटुंबातील दोन सदस्यांना जनधन योजनेतंर्गत झीरो बॅलन्स खाते उघडता येईल
  2. जनधन योजनेतंर्गत रक्कम जमा आणि काढण्याची निशुल्क सुविधा
  3. मोफत खात्यातील शिल्लकी, जमा रक्कम तपासाता येईल
  4. रुपे डेबिट कार्डद्वारेपण बॅलेन्स तपासता येईल
  5. रक्कम हस्तांतरीत करण्यासाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही
  6. निशुल्क मोबाईल बँकिंगची सुविधा
  7. मोफत मिनी स्टेटमेंट, खात्याचे विवरणपत्र मिळेल
  8. आर्थिक साक्षरतेसंबंधीचे अनेक कार्यक्रम सुरु असतात, त्याचा लाभ होईल
  9. जनधन खात्यातंर्गत एक लाखांचा अपघाती विमा मिळेल
  10. जनधन खाते उघडल्यानंतर तुम्हाला बचत खाते पण उघडता येईल.