Zero Balance Account: दंड ही भरायची गरज नाही आणि बँकेत हक्काचे खाते ही असेल

| Updated on: Feb 11, 2022 | 9:39 AM

झिरो बॅलन्स खाते अर्थात काहीही शिल्लकी न ठेवता उघडता येणारे खाते उघडायचे असेल तर आधार आणि पॅनकार्ड च्या मदतीने असे खाते उघडता येते. या खात्यामुळे कमीतकमी रक्कम ठेवण्याची आवश्यकता राहत नाही आणि बॅलन्स ठेवले नाही म्हणून दंडात्मक कारवाईपासून मुक्ती मिळते.

Zero Balance Account: दंड ही भरायची गरज नाही आणि बँकेत हक्काचे खाते ही असेल
फाईल फोटो
Follow us on

आजच्या घडीला बँकेत खाते असणे गरजेचे आहे. सबसिडीसाठी, योजनेसाठी तसेच अनेक कामांसाठी बँकेतील खाते उपयोगी ठरते. बँकेतील खात्याचे ही अनेक प्रकार असतात. वरकरणी जरी बँक खाते वाटत असले तरी विविध सेवा मिळवण्यासाठी बँकेला रक्कम मोजावी लागते. नोकरदारांचे, व्यापा-यांचे खाते वेगवेगळे असते. त्यानुसार त्यांना सोयी-सवलती उपलब्ध करुन दिल्या जातात. सर्वसामान्यांसाठी ही बँकेत खाते उघडताना झिरो बॅलन्स खाते अथवा ठराविक रक्कम ठेऊन सुविधा प्राप्त करण्यासाठीचे खाते असा प्रकार असतो. न्यूनतम शिल्लकी खात्यात (Minimum Balance)तुम्हाला ठराविक रक्कम दरमहिन्याला त्या खात्यात ठेवावीच लागते. जर बॅलन्स ठेवले नाही तर बँका खात्यात पैसे शिल्लक नाहीत म्हणून दंड (Penalty) लावतात. दंडाची ही रक्कम त्याच खात्यातील उर्वरीत रक्कमेतून कपात (Deduct) केली जाते. त्यामुळे खातेदार हवालदिल होतो. त्याला एकतर खाते दंडाच्या भरपाईसह बंद करावे लागते अथवा खात्यात शिल्लक रक्कम ठेवावी लागते. ही रक्कम अडकून पडते. पण जर बॅलन्स ठेवायचे नसेल तर असे खातेही तुम्हाला बँकेत उघडता येते. आधारकार्ड आणि पॅनकार्ड यांच्या सहायाने झिरो बॅलन्स अकाऊंट (Zero Balance Account) उघडता येते.

BSBDA म्हणजे काय रे भाऊ

खात्यात शिल्लकी ठेवण्याची विनाअट मान्य नसेल तरी अशा लोकांसाठी बँक खाते उघडण्याची परवानगी देते. या खात्याला बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट अकाउंट (BSBDA) म्हणतात. या खात्यात ग्राहकाला कमीतकमी शिल्लक रक्कम ठेवण्याची गरज नसते. तसेच खाते उघडणे ही सहजसोपे असते. आधारकार्ड आणि पॅनकार्ड यांच्या सहायाने खाते उघडता येते. तसेच गरज वाटल्यास फॉर्म क्रमांक 60 भरुनही तुम्ही बचत खाते उघडू शकता. विशेष म्हणजे या खात्यात शिल्लकी नसल्यास तुम्हाला दंड भरावा लागत नाही. त्यासाठी तुमच्या खात्यातून कसली ही रक्कम कपात करण्यात येत नाही. 50 रुपयांपेक्षा अधिक बॅलन्स ठेवता येत नाही. एका महिन्यांत 10 हजार रुपयांची रक्कम काढता येते, हस्तांतरीत करता येते. मात्र दहा हजारांपेक्षा अधिकची रक्कम काढण्याला मर्यादा आहेत. केवायसी अद्ययावत होत नाही, तोपर्यंत या खात्यात परदेशातील खात्यातून रक्कम जमा करता येत नाही. असे खाते 12 महिन्यांसाठी वैध असते. त्यानंतर बँकेला सूचित करुन आवश्यक कागदपत्रांसह त्याचा कालावधी वाढवता येतो.
हे बचत खाते उघडण्यासाठी कोणतीही विशिष्ट अट नाही. कोणतीही व्यक्ती कोणत्याही वयात किंवा कोणत्याही उत्पन्नाच्या आधारावर हे खाते उघडू शकते. हे खाते उघडण्यासाठी आपल्याला प्रारंभिक ठेव ठेवण्याची आवश्यकता नाही. खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवण्याचाही नियम नाही. तुमचं आधीच नियमित बचत खातं आहे, पण त्यात किमान बॅलन्स ठेवता येत नसेल तर त्याचं रूपांतर तुम्ही बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट अकाउंटमध्ये करू शकता. या खात्यावर सर्व बँकिंग सेवांचा लाभ देण्यात येतो. एटीएम कम डेबिट कार्डची सुविधा ही मोफत दिली जाते.

बेसिक सेव्हिंग अकाउंटची खासियत

बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट अकाउंटमध्ये तुम्ही हव्या तितक्या वेळा पैसे जमा करू शकता. त्याला काही मर्यादा नाही. नवीन नियमांनुसार बँकेतून ठराविक वेळा मोफत बँकिग व्यवहार करता येतात. यामध्ये एटीएम व्यवहार आणि आरटीजीएस किंवा एनईएफटी, क्लिअरिंग, इंटरनेट डेबिट, स्टँडिंग इन्स्ट्रक्शन, ईएमआय यांचा समावेश आहे. हे लक्षात ठेवा की नियमित बचत खाते आणि सर्वसामान्य बचत खाते एकाच बँकेत एकाच व्यक्तीला उघडता येत नाही. त्याला यापैकी एका खात्याची निवड करावी लागते. अथवा त्याला या खात्यातून दुस-या खात्यात वर्ग होत, संबंधित खात्याच्या सेवा मिळविता येतात.

हे खाते कोण उघडू शकेल?

एखाद्या ग्राहकाचे बँकेत नियमित बचत खाते असेल आणि त्याच बँकेत बेसिक सेव्हिंग अकाउंट उघडायचे असेल, तर एक विशेष नियम आहे. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट अकाउंट उघडल्यानंतर 30 दिवसांच्या आत ग्राहकाला नियमित बेसिक अकाउंट बंद करावं लागेल. .हा नियम केवळ नियमित बचत खात्यांसाठी आहे. ग्राहकाला एकाच बँकेत मुदत ठेव, आवर्ती ठेव किंवा मुदत ठेव खाते उघडायचे असेल, तर तो ते सहज उघडू शकतो आणि त्यासाठी सर्वसाधारण बचत खात्याचे बंधन नाही.

किती रक्कम जमा करता येते

सर्वसाधारण बँक खात्यात एका वर्षात एक लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम ठेवता येत नाही. जमा ही करता येत नाही. हे खाते एकावेळी ५० रुपयांपेक्षा जास्त शिल्लक ठेवू शकत नाही. एका महिन्यात रोख रक्कम काढणे किंवा हस्तांतरित करून डेबिटची मर्यादा 10 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावी. जोपर्यंत पूर्णपणे केवायसी होत नाही, तोपर्यंत विदेशातील पैसे या खात्यात जमा करता येत नाहीत. अशी छोटी खाती १२ महिन्यांसाठी वैध असून पुढील १२ महिने मुदतवाढ द्यायची असेल तर आवश्यक ती कागदपत्रे सादर करावी लागतात. हे खाते कोणत्याही सीबीएस-संलग्न शाखेतून उघडले जाऊ शकते.

अचानक झालेला धनलाभ ही डोकेदुखी ठरेल, औरंगाबादच्या जनार्दन औटेंसारखी चूक करणं महागात पडेल

Shark Tank india : काम करणार की घर सांभाळणार? विसरा IAS, IPS बघा घरातून काढलेल्या पोरांची बिग डील

Video: मराठी पोरं ह्या गुजराती पोराचा आदर्श घेतील का? चहा विकता विकता कोट्याधीश झालेल्या तरुणाला ऐकाच !