Fixed Deposit : एफडीत गुंतवणुकीचा सुवर्णकाळ, अजून व्याजदर वधारणार?

| Updated on: Apr 08, 2023 | 10:19 AM

Fixed Deposit : गेल्यावर्षी मुदत ठेव गुंतवणूकदारांना सर्वात कमी व्याजदर मिळाले. यंदा मात्र एफडीवरील व्याजदर वाढले आहे. आता गुंतवणुकीची ही सर्वात योग्य वेळ आहे की, व्याजात वाढ होईल.

Fixed Deposit : एफडीत गुंतवणुकीचा सुवर्णकाळ, अजून व्याजदर वधारणार?
फायद्याचे गणित काय
Follow us on

नवी दिल्ली : शेवटी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) व्याजदराची मोटार यावेळी काही दामटली नाही. महागाई आटोक्यात आणण्यासाठी आरबीआयने गेल्या वर्षभरात मोठी दरवाढ केली. ग्राहकांवर त्यामुळे ईएमआयचा बोजा पडला. पण मुदत ठेवीत (FD) गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा फायदा झाला. गेल्यावर्षी मुदत ठेवीदारांना निराश व्हावे लागले होते. व्याजदर प्रचंड घसरले होते. यंदा मात्र गुंतवणूकदारांची चांदी आहे. सध्या एफडीवर सर्वाधिक व्याजदर मिळत आहे. त्यामुळे जुनी एफडी मोडून नवीन एफडी करावी का? अजून काही दिवस थांबल्यावर मुदत ठेवीवर जास्त व्याजदर (Interest Rates) मिळेल का? असा संभ्रम गुंतवणूकदारांमध्ये आहे. त्याचं उत्तर काय आहे.

वर्षभरात रेपो रेट 2.5 टक्के वाढला
आरबीआयने मे 2022 पासून ते आतापर्यंत रेपो दरात 190 बेसिस प्वॉईंट्सची वृद्धी केली आहे. डिसेंबरपर्यंत रेपो दर 5.90% होता. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआय रेपो दरात वाढ केली. रेपो दर 6.25 टक्क्यांवर पोहचला होता. 7 डिसेंबर रोजी रेपो दरात 35 बीपीएसने वाढ करण्यात आली होती. तर आता या फेब्रुवारी महिन्यात पुन्हा हा दर 25 बीपीएसने वाढला आहे. त्यामुळे रेपो दर 6.50% पर्यंत गेला. वर्षभरात रेपो रेट 2.5 टक्के वाढला.

दरवाढीचा घ्या फायदा
गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते, मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा सुवर्णकाळ आहे. व्याजदरात गेल्यावर्षीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे मुदत ठेवमध्ये गुंतवणूकीसाठी ही योग्य वेळ आहे. पण त्यासाठी जुनी एफडी मोडण्याबाबत गुंतवणूकदारांनी नुकसानीचा आधी विचार करावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा

आता व्याजदर वाढेल
तज्ज्ञांच्या मते, आरबीआयने रेपो दरात तीन महिन्यांसाठी कोणताही बदल केलेला नाही. जून महिन्यात रेपो दरात वाढ झाली तरी ती फार मोठ नसेल. सध्या एफडीवर गेल्यावर्षीपेक्षा अधिक व्याज मिळत आहे. सध्या सर्वाधिक व्याज मिळत आहे. जून महिन्यात बँका या व्याजदरात वाढ करण्याची शक्यता कमी आहे. पण सध्याचा काळ गुंतवणुकीसाठी चांगला आहे.

गुंतवणूकदारांना चांगला पर्याय
सध्या सोने-चांदीने सर्वांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. या मौल्यवान धातूमध्ये परतावा जोरदार असला तरी, गुंतवणुकीसाठी मोठी रक्कम खर्ची पडणार आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी आता एफडीकडे मोर्चा वळविला आहे. सोन्याने जानेवारी ते मार्च या दरम्यान 8 टक्के परतावा दिला होता. तर चांदीने सर्वाधिक 12 टक्के परतावा दिला आहे. डॉलर इंडेक्स नरमल्याने सोने-चांदीचे भाव वधारले आहेत.

एफडी करतानाची स्ट्रेटर्जी
गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांना दीर्घकालीन, मध्यम आणि शॉर्ट टर्म मुदत ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. एकाच योजनेत अधिक पैसा गुंतविण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या गरजेनुसार विविध पर्यायांमध्ये गुंतवणूक करावी. काही दिवसांनी जून महिन्यात पुन्हा आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक आहे. त्यातील निर्णयाचाही परिणाम दिसून येईल. त्यामुळे गुंतवणूक करताना चोखंदळ असणे फायद्याचे ठरेल.