LIC Jeevan Shanti Policy : टेन्शन छूमंतर! एकाच मृत्यू झाल्यास दुसऱ्याला मिळणार पेन्शन

| Updated on: Jan 22, 2023 | 9:10 PM

LIC Jeevan Shanti Policy : एलआयसीच्या या योजनेत गुंतवणूकदारांना मोठा फायदा होईल.

LIC Jeevan Shanti Policy : टेन्शन छूमंतर! एकाच मृत्यू झाल्यास दुसऱ्याला मिळणार पेन्शन
Follow us on

नवी दिल्ली : एलआयसीच्या न्यू जीवन शांती योजनेत (LIC New Jeevan Shanti Policy) गुंतवणूक केल्यास निवृत्तीनंतरच्या आयुष्याची काळजी मिळेल. गुंतवणूकदारांना उतारवयात पेन्शन (Pension) सुरु झाल्याने त्यांच्या औषधांचा आणि इतर खर्च भागेल. या योजनेत तुम्हाला अल्प गुंतवणुकीत चांगला परतावा मिळेल. भारतीय आयुर्विमा महामंडळाने न्यू जीवन शांती योजनेत नुकतीच सुधारणा केली आहे. त्यामुळे या 5 जानेवारीपासून योजनेत सहभागी होणाऱ्या गुंतवणूकदारांना (Investors) या पॉलिसीवर अधिक व्याज मिळेल.

या योजनेत गुंतवणुकीचे अनेक फायदे आहेत. आता विमाधारकांना या योजनेत प्रति 1,000 रुपयांवर 3 ते 9.75 रुपयांपर्यंत इन्सेटिंव मिळेल. खरेदी किंमत आणि निश्चित कालावधी आधारे इन्सेटिंव मिळते. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी एलआयसीने खास सवलत दिली आहे.

या महिन्यात एलआयसीने खरेदी मूल्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यासाठी खास सवलत दिली. त्यानुसार, प्रति 1,000 रुपयांवर 3 रुपये ते 9.75 रुपयांचा इन्सेंटिंव देण्याचा निर्णय घेण्यात आला. अर्थात इन्सेटिंव हा योजनेच्या कालावधीवर अवलंबून आहे.

हे सुद्धा वाचा

ही योजना गुंतवणूकदार ऑनलाईनसह ऑफलाईन ही खरेदी करता येते. एलआयसीची जीवन शांती (LIC Jeevan Shanti Policy) ही मोठी वार्षिक योजना आहे. यामध्ये व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबियांना फायदा होतो.

या योजनेत 30 ते 79 वर्षापर्यंतचा कोणताही भारतीय नागरीक ही पॉलिसी खरेदी करु शकतो. या योजनेत किमान 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. पॉलिसी खरेदी केल्यानंतर तुमचा विचार बदलल्यास पॉलिसी सरेंडर करता येते. या पॉलिसीच्या आधारावर तुम्हाला कर्ज ही मिळते.

या योजनेनुसार, एकल पर्यायामध्ये डिफर्ड अॅन्युइटीच्या बाबतीत, तुम्हाला 10 लाख रुपयांची पॉलिसी खरेदी केल्यास 11,192 रुपये मासिक पेन्शन मिळते. तर कम्युनिटी लाईफसाठी मासिक पेन्शन 10,576 रुपये मिळेल.

एलआयसी योजनेत सदस्याचा मृत्यू झाल्यास, त्यासंबंधीचा लाभ मिळतो. ज्या व्यक्तीने या योजनेत गुंतवणूक करेल, त्याच्या मृत्यूनंतर, त्याचे कुटुंब आणि वारसदाराला पेन्शनसह इतर अनेक फायदे होतात.