कर्जाच्या हप्त्यांचं ओझं कसं कमी कराल, ‘या’ दोन युक्त्या वापरुन पाहा

| Updated on: Oct 10, 2021 | 10:46 AM

Loan EMI | जर या सर्व गोष्टी योग्य नियोजनाने केल्या तर तुम्ही दरमहा हजारो रुपयांची बचत करू शकता. जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारचे कर्ज घेता तेव्हा ईएमआयचा बारकाईने अभ्यास करा. या दरम्यान तुम्हाला दिसून येईल की ईएमआय रक्कम दोन भागांमध्ये विभागली गेली आहे.

कर्जाच्या हप्त्यांचं ओझं कसं कमी कराल, या दोन युक्त्या वापरुन पाहा
एसबीआय लोन/प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

नवी दिल्ली: हल्लीच्या काळात प्रत्येक गोष्टीसाठी कर्ज घेणे, ही काही नवी बाब राहिलेली नाही. त्यामुळे अनेकांना कर्जाचे मासिक हप्ते (EMI) कसे फेडायचे, याची चिंता लागून राहिलेली असते. कार खरेदी करायची, घर घ्यायचे, सुट्टीची योजना करायची किंवा मोबाईल, लॅपटॉपसह कोणतीही लक्झरी वस्तू खरेदी करायची. क्रेडीट कार्ड आणि कर्जाच्या मदतीने सर्व कामे पूर्ण होतात. परंतु यामुळे ईएमआयचे ओझे वाढते. अशा परिस्थितीत, ईएमआयच्या बाबतीत तुम्हाला किती जादा पैसे मोजावे लागतील हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. हे ओझे कमी कसे करायचे हे अधिक महत्त्वाचे आहे. यासाठी काही गोष्टी समजून घेऊया.

जर या सर्व गोष्टी योग्य नियोजनाने केल्या तर तुम्ही दरमहा हजारो रुपयांची बचत करू शकता. जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारचे कर्ज घेता तेव्हा ईएमआयचा बारकाईने अभ्यास करा. या दरम्यान तुम्हाला दिसून येईल की ईएमआय रक्कम दोन भागांमध्ये विभागली गेली आहे. एक भाग व्याजाची परतफेड आहे, तर दुसरा भाग मूळ रकमेची परतफेड आहे. सुरुवातीला, कोणत्याही कर्जासाठी ईएमआयची परतफेड करताना, एक मोठा भाग व्याज म्हणून जातो, तर एक छोटासा भाग मूळ रकमेची परतफेड करण्यासाठी जातो. हळूहळू कर्ज जुने होते आणि ईएमआयचा एक मोठा भाग मुख्य परतफेडीकडे जातो, तर व्याज परतफेडीची रक्कम कमी होते.

कर्जाच्या कालावधीवर ठरते रक्कम

मुख्य रकमेच्या परतफेडीत किती EMI जमा होईल आणि व्याज परतफेडीसाठी किती रुपये जातील, हे तुमच्या कर्जाच्या कालावधीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला व्याज म्हणून कमी पैसे द्यायचे असतील तर कर्जाचा कालावधी शक्य तितका कमी ठेवा. यामुळे ईएमआय नक्कीच वाढेल पण तुमची बचत खूप जास्त होईल.

ईएमआयची रक्कम वाढवा

कर्जाचा कालावधी कमी केला तर ईएमआयची रक्कम वाढण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत तुमच्याकडे दोन पर्याय आहेत जे वापरले जाऊ शकतात. पहिला पर्याय म्हणजे दरवर्षी एक ईएमआय अतिरिक्त जमा करणे. म्हणजे, 12 महिन्यांत 13 EMI जमा करा. दुसरा पर्याय म्हणजे दरवर्षी ईएमआय 2 टक्क्यांनी वाढवणे. जसजसे तुमचे उत्पन्न कालांतराने वाढत जाते, तसतसे तुम्ही दरवर्षी EMI रक्कम वाढवू शकता. या दोन युक्त्यांच्या मदतीने तुम्ही लाखो रुपयांपर्यंत बचत करू शकता.

संबंधित बातम्या:

तुमचे एसबीआयमध्ये खाते असेल तर तुम्ही डेबिट कार्डवर घेऊ शकता ईएमआय, असे करा तुमचे शॉपिंग बिल कनवर्ट

ईएमआय फ्री लोन म्हणजे काय? दर महिन्याला हप्ता फेडण्याची चिंताच उरणार नाही

आता गूगल पे किंवा फोन पे वर ईएमआय भरता येणार, कर्जाचे हप्ते देखील जमा करु शकणार