भारतात सोन्याची सर्वाधिक खरेदी श्रीमंत नव्हे तर ‘या’ उत्पन्न गटातील लोक करतात; ‘IGPC’ अहवालामधून समोर आली माहिती

| Updated on: Apr 12, 2022 | 10:23 AM

सोन्याचे (Gold)दागिने भारतामध्ये लोकप्रिय आहेत, प्रत्येक जणाला सोन्याचे दागिने परिधान करण्याची इच्छा असते. भारताचा सोन्याच्या आयातीमध्ये (Gold Demand) जगात दुसरा क्रमांक लागतो. भारतामध्ये सर्वाधिक सोनं कोणता वर्ग खरेदी करत असेल तर तुम्ही सहाजिकच श्रीमंत वर्ग असे उत्तर द्याल. मात्र जर थांबा गोल्ड अँण्ड मार्केट्स - 2022 च्या रिपोर्टमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

1 / 5
सोन्याचे (Gold)दागिने भारतामध्ये लोकप्रिय आहेत, प्रत्येक जणाला सोन्याचे दागिने परिधान करण्याची इच्छा असते. भारताचा सोन्याच्या आयातीमध्ये (Gold Demand) जगात दुसरा क्रमांक लागतो. भारतामध्ये सर्वाधिक सोनं कोणता वर्ग खरेदी करत असेल तर तुम्ही सहाजिकच श्रीमंत वर्ग असे उत्तर द्याल. मात्र जर थांबा गोल्ड अँण्ड मार्केट्स - 2022 च्या रिपोर्टमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतात सर्वाधिक सोने हा श्रीमंत वर्ग खरेदी करत नसून, तो मध्यम वर्ग (Middle Income Group) खरेदी करतो अशी ही माहिती आहे. मध्यम उत्पन्न गटातील वर्ग हा डिजिटल पद्धतीने नाही तर प्रत्यक्षात सोन्याच्या खरेदीवर भर देत असल्याचे देखील हा अहवाल सांगतो.

2 / 5
इंडिया गोल्ड पॉलिसी सेंटर 'IGPC' कडून नुकताच  गोल्ड अँण्ड मार्केट्स - 2022 अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालामधून समोर आलेल्या माहितीनुसार भारतामध्ये श्रीमंत वर्गातील लोक देखील सोन्याची खरेदी करतात, मात्र ते डिजिटल पद्धतीने सोने खरेदी करतात. तर मध्यम वर्ग हा सोन्याची प्रत्यक्षात खरेदी करतो. श्रीमंत वर्गापेक्षा मध्यम वर्गामध्ये सोने खरेदीचे प्रमाण अधिक आहे. वर्षाकाळी 56 टक्के सोन्याची खरेदी हे मध्यम उत्पन्न गटातील लोक करत असल्याची माहिती समोर आली आहे.

3 / 5
या रिपोर्टमध्ये पुढे म्हटले आहे की, मध्यम उत्पन्न गटातील लोक हे गुंतवणुकीसाठी सोन्याला सर्वाधिक पसंती देतात. सोन्यात केलेल्या गुंतवणुकीमध्ये रिस्क कमी असते, त्यामुळे मध्यवर्गीय लोक हे सोन्यात गुंतवणूक करतात. त्यामुळे श्रीमंत वर्गाच्या तुलनेत मध्यमवर्गीय लोकांच्या सोने खरेदीचे प्रमाण अधिक आहे.

4 / 5
ग्राहकांचे सोने खरेदीचे प्रमाण यावर पीपल रिसर्च या संस्थेच्या वतीने देखील एक सर्व्हे करण्यात आला आहे. या सर्व्हेमधून अशी माहिती समोर आली की, नोटबंदी आणि जीएसटी सारख्या निर्णयामुळे सोने खरेदीवर कोणताही परिणाम झाला नसून, नागरिकांचा सोने खरेदीचा कल वाढत आहे.

5 / 5
जगात भारत चीननंतर सोन्याचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. सोन्याची ही आयात प्रामुख्याने ज्वलरी इंडस्ट्रिची गरज लक्षात घेऊन करण्यात येते. गेल्या आर्थिक वर्षामध्ये सोन्याच्या आयातीमध्येध्ये 33.34 टक्क्यांची वाढ झाली आहे.