LPG Cylinder New Rules: ..तर 1 ऑक्टोबरपासून सिलिंडर मिळणारच नाही, 5 नियमात मोठा बदल, जाणून घ्या अन्यथा मोठी अडचण

1 ऑक्टोबरपासून LPG सिलिंडरशी जुडलेल्या नियमात बदल होण्याची शक्यता आहे. सबसिडीसाठी आधार बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनाच्या संदर्भात नियमात बदल होऊ शकतात.

LPG Cylinder New Rules: ..तर 1 ऑक्टोबरपासून सिलिंडर मिळणारच नाही, 5 नियमात मोठा बदल, जाणून घ्या अन्यथा मोठी अडचण
LPG Cylinder New Rules
| Updated on: Sep 30, 2026 | 8:01 PM

जर तुमच्या घरात स्वयंपाकासाठी LPG सिलिंडरचा वापर करत असाल तर १ ऑक्टोबरपासून होणाऱ्या काही नियमबदलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या बदलाचा परिणाम LPG बुकिंग, सबसिडी, डिलीव्हरी आणि कनेक्शनशी संबंधित नियमांवर याचा परिणाम होणार आहे. काही ग्राहकांना बुकींगच्या आधी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. ज्या ग्राहकांनी आतापर्यंत कोणतीही प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यांना पुढील सबसिडीवाले सिलिंडर बुक करण्याआधी ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

हे काम गॅस एजन्सीवर जाऊन केले जाऊ शकते. याशिवाय डिलिव्हरी कर्मचाऱ्याच्या मदतीने या संबंधित तेल कंपनीच्या मोबाईल ऐपद्वारे देखील आधार ऑथेंटिकेशनची सुविधा मिळू शकते.

Loading...

1 ऑक्टोबरपासून बदलू शकतात LPG च्या किंमती

तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला LPG सिलिंडरच्या किंमतीचा आढावा करत असतात. घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरच्य किंमती आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाच्या किंमती, आयात खर्च आणि टॅक्स यासारखी अनेक कारणे अवलंबून असतात.

सध्या दिल्लीत घरगुती LPG सिलिंडरच्या किंमती 942 रुपये आणि कर्मिशियल सिलेंडरच्या किंमती 2747 रुपये आहेत. 1 ऑक्टोबर रोजी कंपन्या किंमतीत बदल करतात की नाही हे नवीन रेट जारी केल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

आता 25 दिवसानंतर दुसरी बुकिंग

घरगुती एलपीजी सिलिंडरचे दोन रिफिलच्या दरम्यानंतचे अंतर बदलले आहे.आता दुसरा सिलिंडर बुक करण्यासाठी किमान 25 दिवसांचे अंतर राखावे लागते. आधी काही शहरी क्षेत्रात 25 दिवसाचा नियम लागू होता. तर ग्रामीण भागात हे अंतर 45 दिवसांचे होते. आता दोन बुकींगमधील 25 दिवसांचे अंतराचा नियम देशभरात सरसकट लागू केला आहे.

PNG च्या सुविधा असलेल्या भागात LPG कनेक्शनवर निर्बंध

ज्या क्षेत्रात पाइप्ड नेचरल गॅस म्हणजे PNG ची सुविधा उपलब्ध आहे. तेथे LPG कनेक्शन संदर्भात नियम कठोर होऊ शकतात. अशा ग्राहकांनी PNG कनेक्शन घेण्यासाठी सांगितले जाऊ शकते.नोटिस मिळाल्यानंतर ठरलेल्या काळात PNG कनेक्शन न घेतल्यास एलपीजी कनेक्शन बंद करण्याची प्रक्रिया सुरु होऊ शकते. यासाठी आपल्या भागात PNG ची सुविधा उपलब्ध आहे की नाही याची माहिती घ्यावी.

सिलिंडर घेताना OTP सांगावा लागेल

LPG च्या डिलिव्हरीच्या दरम्यान आता केवळ बुकींगची माहिती दाखवणे पुरेसे नसणार आहे. डिलिव्हरीच्या वेळी रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर आलेला OTP सांगणे गरजेचे आहे. या नियमाचा उद्देश योग्य ग्राहकांपर्यंत सिलिंडर पोहचवणे आणि बोगस बुकींग वा चुकीची डिलिव्हरी सारख्या समस्येना कमी करणे हे आहे. यासाठी LPG बुक करताना आपला मोबाईल नंबर अपडेट करणे गरजेचे आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us