Petrol Diesel Rate Today: पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

| Updated on: Sep 05, 2021 | 7:43 AM

Petrol and Diesel | मुंबईत पेट्रोल 13 पैशांनी स्वस्त होऊन 107.26 रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहे. तर डिझेलची किंमत प्रतिलीटर 14 पैशांनी घटली असून ते 96.19 च्या पातळीवर आले आहे. तर दिल्लीत प्रतिलीटर पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 101.19 आणि 88.62 रुपये इतका आहे.

Petrol Diesel Rate Today: पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
पेट्रोल-डिझेल
Follow us on

मुंबई: गेल्या आठवडाभरापासून स्थिर असलेल्या इंधन दरात रविवारी घट होताना दिसून आली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेल स्वस्त झाल्याने भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी केल्या आहेत. त्यामुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी 10 ते 15 पैशांनी स्वस्त झाले आहे. (Petrol and Diesel rate today)

मुंबईत पेट्रोल 13 पैशांनी स्वस्त होऊन 107.26 रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहे. तर डिझेलची किंमत प्रतिलीटर 14 पैशांनी घटली असून ते 96.19 च्या पातळीवर आले आहे. तर दिल्लीत प्रतिलीटर पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 101.19 आणि 88.62 रुपये इतका आहे.
गेल्या काही काळात इंधनाचे दर सातत्याने चढे असूनही ऑगस्ट महिन्यात पेट्रोलच्या मागणीत वाढ नोंदवली गेली आहे. तर दुसरीकडे डिझेलची मागणी घटली आहे. पेट्रोलियम कंपन्यांच्या आकडेवारीनुसार ऑगस्ट महिन्यात 24.3 लाख टन पेट्रोलची विक्री झाली.

गेल्यावर्षीच्या याच कालावधीत 23.3 लाख टन पेट्रोलची विक्री झाली. त्यामुळे यंदा पेट्रोल विक्रीचे प्रमाण 13.6 टक्क्यांनी वाढले आहे. तर दुसरीकडे ऑगस्टमध्ये डिझेलच्या मागणीत घट नोंदवण्यात आली आहे. ऑगस्टमध्ये 49.4 लाख टन डिझेलची विक्री झाली. ऑगस्ट 2019 च्या तुलनेत हे प्रमाण 9.8 टक्क्यांनी कमी आहे. तसेच यंदाच्या वर्षातील जुलै महिन्याच्या तुलनेतही ऑगस्टमध्ये डिझेलचा खप कमी राहिला. पावसाच्या काळात प्रवासाचे प्रमाण कमी झाल्याने डिझेलच्या मागणीत घट झाल्याचा अंदाज आहे.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भाव

आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

‘यूपीए सरकारच्या ‘त्या’ निर्णयामुळे आमच्यासाठी सध्या पेट्रोल-डिझेलचे दर कमी करणे अशक्य’

देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सध्या कपात करणे शक्य नसल्याचे वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले होते. यासाठी त्यांनी यूपीए सरकारलाच जबाबदार धरले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने पेट्रोलियम कंपन्यांना चढ्या दराने तेल रोखे (Oil Bonds) जारी केले होते. त्या रोख्यांचा कालावधी आता पूर्ण झाला असून पेट्रोलियम कंपन्यांकडून ते वटवले जात आहेत. परिणामी मोदी सरकारला रोख्यांचे पैसे आणि व्याज चुकते करावे लागत आहे. त्यामुळे आम्हाला तुर्तास इंधनाचे दर (Fuel Price) कमी करणे शक्य नाही. यूपीए सरकारने ही चूक केली नसती तर आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सहज कपात करता आली असती, असे प्रतिपादन निर्मला सीतारामन यांनी म्हटले होते.

आधीच्या काँग्रेस सरकारच्या काळात, इंधनाच्या विक्री किमती कृत्रिमरीत्या कमी ठेवून, या तुटीची भरपाई ही सरकारी तेल कंपन्यांना रोख्यांची विक्री करून केली गेली. त्या रोखे आणि त्यांवरील व्याजाची परतफेड आता सरकारला करावी लागत आहे. गेल्या पाच वर्षांत तेल रोख्यांवरील व्याजापोटी सरकारने 60 हजार कोटी रुपये चुकते केले आहेत. तरीही 1.30 लाख कोटी रुपयांचे दायित्व अजून बाकी आहे, असे सीतारामन यांनी म्हटले. हे ओझे नसते तर आमच्या सरकारने इंधन विक्रीवरील अबकारी दर कमी केला असता, असेही निर्मला सीतारामन यांनी सांगितले होते.

संबंधित बातम्या:

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव पुन्हा कडाडले, भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

पेट्रोल-डिझेल चढ्या दरात विकून इंडियन ऑईलने किती नफा कमावला?

Fuel Price Hike: केंद्र सरकारने वर्षभरात पेट्रोल-डिझेलवरील कर वाढवला नाही, मग 32 रुपयांची दरवाढ कशी झाली?

(Petrol and Diesel rate today)