Bank KYC : केवायसी अपटेड करण्यासाठी बँकेत जाता कशाला? या सोप्या पद्धतीने लगेचच होईल काम

| Updated on: Jan 07, 2023 | 7:25 PM

Bank KYC : केवायसी अपडेट करण्यासाठी बँकेच्या पायऱ्या झिजवता कशाला, राजेहो..

Bank KYC : केवायसी अपटेड करण्यासाठी बँकेत जाता कशाला? या सोप्या पद्धतीने लगेचच होईल काम
Follow us on

नवी दिल्ली : केवायसी अपडेट (KYC Update) करण्यासाठी तुम्हाला बँकेच्या पायऱ्या झिजवण्याची काहीच गरज नाही. लांबच लांब रांगात उभे रहा, कर्मचाऱ्यांशी डोकं लावा. त्यापेक्षा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला केवायसी अपडेट करता येणार आहे. खाते उघडताना तुम्ही संबंधीत सर्व आवश्यक कागदपत्रे बँकेच्या शाखेत जमा केली असतील. तुमच्या पत्त्यात कसलाच बदल नसेल तर तुम्हाला ही सवलत मिळते. नो युवर कस्टमरची (Know Your Customer) सविस्तर माहिती अद्ययावत करण्यासाठी तुम्हाला बँकेच्या चकरा मारण्याची गरज नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) याविषयीची सुविधा दिली आहे.

तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की, ही सोप्पी पद्धत कोणती आहे. तुमच्या केवायसी डिटेल्समध्ये कुठलाच बदल नसेल तर खातेदाराला केवायसी अपडेट करता येते. ई-मेल, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक, एटीएम अथवा दुसऱ्या कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करुन हे काम करता येते.

केवायसी आपडेट करण्यासाठी ग्राहकांवर बँकांनी कोणताच दबाव न आणण्याचे आवाहन आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केले आहे. बँकांनी ग्राहकांना केवायसी अपडेट करण्यासाठी शाखेत येण्याचा आग्रह न धरण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. परिणामी ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

हे सुद्धा वाचा

यापूर्वीच ग्राहकांनी त्यांची आवश्यक सर्व कागदपत्रे बँकेत जमा केली असतील तर त्यांना बँकेत येण्याची गरज नाही. त्यांना केवायसी बाह्यपद्धतीने अपडेट करता येतील. खातेदाराला त्याचे स्वःचे घोषणापत्र मात्र जोडावे लागणार आहे.

RBI ने याविषयीच्या मार्गदर्शक सूचना संबंधित सर्व बँकांना पाठविल्या आहेत. त्यात ग्राहक त्याच्या नोंदणीकृत ई-मेल आयडी, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक, एटीएम, ऑनलाईन बँकिंग अथवा इंटरनेट बँकिग, मोबाईल अॅप यासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ही प्रक्रिया पार पाडू शकतो.

RBI मार्गदर्शक सूचनांनुसार, खातेदाराला त्याचा पत्ता बदलता येतो. त्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत. ग्राहकाला बँकेत दाखल त्याचा पत्ता बदलता येतो. प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दोन महिन्यांच्या आत त्याच्या पत्त्या बदल करण्यात येतो.