पॅन-आधार कार्ड लिंकबाबत सेबीचा अल्टीमेटम; जुलै 2017 पूर्वीचे पॅनकार्ड असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्या

| Updated on: Sep 04, 2021 | 7:13 AM

आपल्याला या कागदपत्रांची वारंवार गरज असते. कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारात तुम्हाला पॅन क्रमांक आवश्यक आहे. त्यामुळे पॅनकार्डबाबत या नियमाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

पॅन-आधार कार्ड लिंकबाबत सेबीचा अल्टीमेटम; जुलै 2017 पूर्वीचे पॅनकार्ड असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्या
पॅन-आधार कार्ड लिंकबाबत सेबीचा अल्टीमेटम
Follow us on

नवी दिल्ली : पॅन कार्डला आधारशी लिंक करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. जर तुमचे पॅन कार्ड या तारखेपर्यंत आधारशी जोडलेले नसेल तर ते बंद होऊ शकते. याबाबत सरकारने स्पष्ट सूचना दिल्या आहेत. सीबीडीटी अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने यासंदर्भात निर्देश जारी केले आहेत. आता सीबीडीटीच्या (CBDT) निर्देशांचे पालन करून सेबी म्हणजेच भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाने (सेबी) यासंदर्भात निर्देश दिले आहेत. त्यामुळे आपल्याला काहीही करून आता पॅनकार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे आवश्यकच आहे. (SEBI’s ultimatum regarding PAN-Aadhar card link; Take special care of those who have PAN card before July 2017)

मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स या ओळखीच्या पुराव्यांबरोबच आधार कार्ड आणि पॅनकार्डदेखील अत्यंत महत्वाच्या कागदपत्रांमध्ये समाविष्ट केले आहेत. आपल्याला या कागदपत्रांची वारंवार गरज असते. कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारात तुम्हाला पॅन क्रमांक आवश्यक आहे. त्यामुळे पॅनकार्डबाबत या नियमाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

बँकेकडून कर्ज घ्यावे, कोणाकडे मोठी रक्कम हस्तांतरित करावी, व्यावसायिक व्यवहार करावा किंवा आयकरसंबंधित कोणतेही काम करायचे असेल तर तुम्हाला पॅन कार्डशिवाय हे शक्य नाही. अशा परिस्थितीत जर पॅनकार्ड बंद झाले तर.. केवळ कल्पना करूनही तुम्ही अस्वस्थ होऊ शकता. कारण पॅनकार्ड बंद झाले तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

तुमच्याकडे 2 जुलै 2017 पूर्वीचे पॅनकार्ड आहे का?

सीबीडीटीच्या निर्देशांनुसार सेबीने आधार-पॅनकार्ड लिंक करण्याबाबत अल्टिमेटम जारी केला आहे. विशेषत: ज्यांचे पॅनकार्ड 2 जुलै 2017 पूर्वीचे आहे, त्यांनी फार खबरदारी घ्यायला हवी. जर तुम्हाला 2 जुलै 2017 पूर्वी बनवलेले पॅनकार्ड मिळाले असेल तर आधार-पॅन लिंक करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे. सीबीडीटीच्या सूचनांचे पालन करीत सेबीने यासंदर्भात निर्देश जारी केले आहेत.

सरकारने याआधीच पॅन-आधारकार्ड लिंक करणे बंधनकारक केले होते. त्याची शेवटची तारीख अनेकवेळा वाढवण्यात आली आहे. याआधी आधारला पॅन कार्डशी लिंक करण्याची अंतिम तारीख 30 जून होती, जी आता तीन महिन्यांनी वाढवून 30 सप्टेंबर 2021 करण्यात आली आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ज्या लोकांना शेवटच्या तारखेपर्यंत आधार लिंक करणे शक्य होणार नाही, त्यांचे पॅन कार्ड रद्द केले जाऊ शकते.

आधार-पॅन कसे जोडायचे?

आधार ऑनलाइन पॅनशी जोडण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे नवीन आयकर वेबसाइटला भेट देणे. नवीन https://www.incometax.gov.in/iec/foportal या वेबसाइटला भेट द्या. यानंतर तेथे उपलब्ध सुविधांमधून ‘लिंक आधार’ वर क्लिक करा. एक नवीन पेज उघडेल. यामध्ये तुम्हाला पॅन, आधार क्रमांक, तुमचे नाव आणि मोबाईल क्रमांक आधारवर नोंदवावा लागेल.

जर तुमच्या आधारमध्ये फक्त जन्माचे वर्ष लिहिले असेल, तर तुम्हाला हा पर्याय टिक करावा लागेल- ‘माझ्याकडे फक्त आधार कार्डमध्ये जन्म वर्ष आहे’. (I have only year of birth in Aadhaar card.)

यानंतर ‘मी माझा आधार तपशील सत्यापित करण्यास सहमत आहे’ ( I agree to validate my Aadhaar details) असे लिहिलेल्या बॉक्सवर टिक करून पुष्टी करा. त्यानंतर ‘आधार लिंक’वर क्लिक करा. यानंतर एक पुष्टीकरण पृष्ठ उघडेल. यामध्ये तुम्हाला दिसेल की तुमचा आधार क्रमांक पॅनसोबत यशस्वीरित्या लिंक झाला आहे. (SEBI’s ultimatum regarding PAN-Aadhar card link; Take special care of those who have PAN card before July 2017)

इतर बातम्या

Video | पोहण्यासाठी महिला स्विमिंग पुलावर उभी राहिली, पाण्यात उडी मारताच उडाली फजिती, पाहा मजेदार व्हिडीओ

पीएम किसानचा हप्ता घेणाऱ्या शेतकऱ्यांना मिळू शकतो पेन्शन लाभ, या योजनेअंतर्गत जमा करावे लागतील इतके पैसे