Video | पोहण्यासाठी महिला स्विमिंग पुलावर उभी राहिली, पाण्यात उडी मारताच उडाली फजिती, पाहा मजेदार व्हिडीओ

सध्या एका महिलेचा पोहोत असतानाचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. या महिलेची चांगलीच फजिती उडाली आहे. पाण्यात उडी मारल्यानंतर या महिलेसोबत जे घडलं आहे; ते पाहून नेटकऱ्यांना हसू आवरलेले नाही.

Video | पोहण्यासाठी महिला स्विमिंग पुलावर उभी राहिली, पाण्यात उडी मारताच उडाली फजिती, पाहा मजेदार व्हिडीओ
women viral video

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. या मंचावर कधी प्राण्यांचे आणि पक्षांचे व्हिडीओ व्हायरल होतात. तर कधी एखाद्या महिलेचा किंवा माणसाचा मजेदार व्हिडिओ चर्चेचा विषय ठरतो. सध्या एका महिलेचा पोहोत असतानाचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. या महिलेची चांगलीच फजिती उडाली आहे. पाण्यात उडी मारल्यानंतर या महिलेसोबत जे घडलं आहे; ते पाहून नेटकऱ्यांना हसू आवरलेले नाही.

पाण्यात पोहण्यासाठी महिला उत्सुक

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये महिला स्वीम सूट परिधान करून स्विमिंग पुलावर उभी राहिली आहे. पाण्यात उडी मारून मनसोक्त पोहण्यासाठी महिला तयार असल्याचे दिसत आहे. यावेळी मागून एक व्यक्ती या महिलेचा व्हिडीओ रेकॉर्ड करत असल्याचं दिसतंय. या महिलेने थोड्या वेळानंतर डाईव्ह बोर्डवरून स्विमिंग पूलमध्ये उडी घेतली आहे. मात्र, यावेळी चांगलाच घोळ झाला आहे. महिलेने पाण्यात यशस्वी पद्धतीने डाईव्ह मारल्याचे दिसत आहे. मात्र, तिने डोक्यावर लावलेले वीग डाईव्ह बोर्डवरच गळून पडले आहे. महिलेने परिधान केलेले वीग डायनिंग बोर्डवर पडल्याचे आपल्याला दिसत आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

महिलेच्या डोक्यावरचे वीग गळून पडल्यामुळे नेटकऱ्यांना हसू आवरलेले नाही. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी पोट धरून हसत आहेत. लोकांनी यावेळेला व्हिडीओला उस्फूर्तपणे शेअर केले आहे. हा व्हिडीओ कुठला आहे याची माहिती मिळू शकलेली नाही, मात्र त्याची सध्या सर्व समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात चर्चा आहे.

इतर बातम्या :

Video | तरुणाची हँडलकडे पाठ, तरीही चावलतोय शिताफीने बाईक, चक्रावून सोडणारा व्हिडीओ व्हायरल

Video | डान्स फ्लोअरवर मित्रांचा भन्नाट डान्स, पण मध्येच काहीतरी बिनसलं अन् घडला विचित्र प्रकार, व्हिडीओ पहाच !

Video | चार मित्रांची बाईकवर सफर, पण मध्येच साप आला अन् भलतंच घडलं, पाहा व्हिडीओ

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI