AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Karisma Kapoor: सर्वांसमोर लग्न जाहीर केल्यानंतर अचानक बिघडल्या गोष्टी; अभिषेक बच्चनसोबत साखरपुडा मोडल्याप्रकरणी करिश्मा कपूर म्हणाली..

Karisma Kapoor: अभिनेत्री करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याची एकेकाळी जोरदार चर्चा होती. हे दोघं लग्न करणार होते. इतकंच नव्हे तर त्यांचा साखरपुडाही पार पडला होता.

Karisma Kapoor: सर्वांसमोर लग्न जाहीर केल्यानंतर अचानक बिघडल्या गोष्टी; अभिषेक बच्चनसोबत साखरपुडा मोडल्याप्रकरणी करिश्मा कपूर म्हणाली..
Karisma Kapoor and Abhishek BachchanImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 15, 2026 | 11:53 AM
Share

Karisma Kapoor: अभिनेत्री करिश्मा कपूर तिच्या अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते. नव्वदच्या दशकात आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या करिश्माच्या आयुष्यात एक काळ असा होता, जेव्हा ती अभिनेता अभिषेक बच्चनसोबत लग्न करणार होती. दोघांचा साखरपुडाही झाला होता. मात्र, लग्नापूर्वीच त्यांचं नातं संपुष्टात आलं. या ब्रेकअपचा करिश्माला मोठा मानसिक धक्का बसला होता. या कठीण काळाबद्दल तिने एका मुलाखतीत मनमोकळेपणाने भाष्य केलं होतं. ‘त्या काळात मी खूप काही सहन केलं’, असं म्हणत तिने आपल्या भावनिक संघर्षाबद्दल सांगितलं होतं.

अभिषेक बच्चनसोबत मोडला होता साखरपुडा

करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याची एकेकाळी बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा होती. दोघांचे कुटुंबीयही या नात्याबद्दल सकारात्मक होते. अमिताभ बच्चन यांच्या 60 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ऑक्टोबर 2002 मध्ये अभिषेक आणि करिश्माच्या साखरपुड्याची घोषणा करण्यात आली होती. कपूर आणि बच्चन या दोन प्रतिष्ठित कुटुंबांमधील हे नातं चर्चेचा विषय ठरलं होतं. मात्र, 2003 मध्ये दोघांचा साखरपुडा मोडल्याची बातमी समोर आली. त्यांच्या नात्यात नेमकं काय बिनसलं, याबद्दल अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. मात्र, दोघांनीही यामागचं नेमकं कारण सार्वजनिकपणे स्पष्ट केलं नाही.

‘तो काळ माझ्यासाठी खूप वेदनादायी होता’

अभिषेकसोबतचं नातं संपल्यानंतर करिश्माने काही काळ स्वतःला सार्वजनिक आयुष्यापासून दूर ठेवलं होतं. 2003 मध्ये रेडिफला दिलेल्या मुलाखतीत तिने या कठीण काळाबद्दल भाष्य केलं होतं. तिने सांगितलं होतं की, त्या वर्षाची सुरुवात तिच्यासाठी अत्यंत वेदनादायी होती. आयुष्यात घडलेल्या गोष्टींमुळे तिला खूप मानसिक त्रास सहन करावा लागला. कोणत्याही मुलीला अशा वेदनादायी परिस्थितीतून जावं लागू नये, असंही तिने म्हटलं होतं. करिश्माने सांगितलं होतं की, तिला स्वतःच्या दुःखाचा सामना एकटीलाच करावा लागला. मात्र, काळ हे प्रत्येक जखमेवरचं औषध असतं. आयुष्यात जे काही घडतं, ते नशिबाचा भाग असतं आणि त्याचा स्वीकार करून पुढे जाणं गरजेचं आहे, अशी भूमिका तिने मांडली होती.

कुटुंबीयांनी दिली कठीण काळात साथ

या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी करिश्माला तिच्या कुटुंबीयांची मोठी मदत झाली. आई बबिता, वडील रणधीर कपूर, बहीण करीना कपूर, आजी कृष्णा राज कपूर आणि जवळच्या मित्रांनी तिला मानसिक आधार दिला. त्यांच्या पाठिंब्यामुळेच ती या परिस्थितीतून सावरू शकली, असं करिश्माने सांगितलं होतं.

दरम्यान, अभिषेक बच्चनसोबतचं नातं संपल्यानंतर करिश्माने 2003 मध्ये उद्योगपती संजय कपूर यांच्याशी लग्न केलं. या लग्नातून त्यांना समायरा आणि कियान अशी दोन मुलं झाली. मात्र, 2016 मध्ये करिश्मा आणि संजय यांचा घटस्फोट झाला. दुसरीकडे अभिषेकने 2007 मध्ये अभिनेत्री ऐश्वर्या रायशी लग्न केलं. आज दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. मात्र, करिश्मा आणि अभिषेक यांच्या मोडलेल्या साखरपुड्याची चर्चा आजही बॉलिवूडमध्ये होताना दिसते.

Follow Us
ऑपरेशन टायगरवर संजय राऊतांचं मोठं विधान; सत्तेच्या फेविकॉलमुळे हे....
Sanjay Raut : ऑपरेशन टायगरवर संजय राऊतांचं मोठं विधान; सत्तेच्या फेविकॉलमुळे हे....
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार!
Jaykumar Gore : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार! पहिलं अध्यक्षपद...; जयकुमार गोरेंचं मोठं विधान
पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? राजकीय....
NCP Politics : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला पूर्णपणे ब्रेक; पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
राऊतांच्या वाढदिवशी मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी
Sanjay Raut Birthday : संजय राऊतांच्या वाढदिवशी मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी; महाराष्ट्रभरातून आलेल्या समर्थकांकडून शुभेच्छांचा वर्षाव
सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले, तरी साईभक्तांची श्रद्धा कायम....
Shirdi Sai Baba Donation : सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले, तरी साईभक्तांची श्रद्धा कायम; वर्षभरात साईचरणी 14.5 किलो सोने आणि 255 किलो चांदी अर्पण
सशस्त्र माओवादापेक्षा दिमागी माओवाद अधिक धोकादायक; फडणवीसांचं विधान...
Devendra Fadnavis : सशस्त्र माओवादापेक्षा दिमागी माओवाद अधिक धोकादायक; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, असं का म्हणाले?
अंबरनाथमध्ये ब्लिंकिटची सेवा आठ दिवसांपासून ठप्प, पगार कपात अन्...
Blinkit Riders Strike : अंबरनाथमध्ये ब्लिंकिटची सेवा आठ दिवसांपासून ठप्प, पगार कपात अन्...; 100 ते 150 रायडर्सचा संप
टोरंट प्रकल्पासाठी कर्जतच्या 150 शेतकऱ्यांना नोटीस; 25 नोव्हेंबरला....
Karjat Torrent Power Project : टोरंट प्रकल्पासाठी कर्जतच्या 150 शेतकऱ्यांना नोटीस; 25 नोव्हेंबरला संयुक्त मोजणी
36 तासांनंतर मायक्रोसॉफ्टच्या सेवा पूर्ववत; कंपनीने ट्विट करत दिली....
Microsoft Services Outage : 36 तासांनंतर मायक्रोसॉफ्टच्या सेवा पूर्ववत; कंपनीने ट्विट करत दिली माहिती
लातूर जिल्हा बँकेसाठी आज मतदान; सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनलमध्ये थेट..
Latur District Bank Election : लातूर जिल्हा बँकेसाठी आज मतदान; सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनलमध्ये थेट लढत, दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला