Video | डान्स फ्लोअरवर मित्रांचा भन्नाट डान्स, पण मध्येच काहीतरी बिनसलं अन् घडला विचित्र प्रकार, व्हिडीओ पहाच !

सोशल मीडियावर डान्सचे व्हिडीओ अनेक असतात, पण सध्या जो व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर होत आहे, तो भन्नाट आहे. हा व्हिडीओ कोणत्यातरी लग्नसोहळ्यातला असल्याचं सांगण्यात येत आहे. जिथे डान्स फ्लोअरवर दोन मुलं नाचताना दिसतात.

Video | डान्स फ्लोअरवर मित्रांचा भन्नाट डान्स, पण मध्येच काहीतरी बिनसलं अन् घडला विचित्र प्रकार, व्हिडीओ पहाच !
DANCING VIRAL VIDEO

मुंबई : सोशल मीडियावर दररोज नवनवे व्हिडीओ अपलोड, शेअर केले जातात. अनेक फनी व्हिडीओ दररोज व्हायरल होत असतात. हे व्हायरल व्हिडीओ हास्यकल्लोळ उडवत असतात. तर काही व्हिडीओंनी संतापाचा पारा चढतो. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुमचं हसून हसून पोट दुखू लागेल. (boy funny dance video went viral video on social media)

डान्स फ्लोअरवर दोन मुलांचा जबरदस्त डान्स

सोशल मीडियावर डान्सचे व्हिडीओ अनेक असतात, पण सध्या जो व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर होत आहे, तो भन्नाट आहे. हा व्हिडीओ कोणत्यातरी लग्नसोहळ्यातला असल्याचं सांगण्यात येत आहे. जिथे डान्स फ्लोअरवर दोन मुलं नाचताना दिसतात. नाचत असताना एक जण दुसऱ्याला उचलतो आणि थेट जमिनीवर फेकून देतो.

स्टेप्स पाहून हसू आवरणार नाही

हे दोघे डान्स करत असतील, काही तर वेगळ्या स्टेप्स करत असतील असं वाटतं. पण एक उंच मुलगा, दुसऱ्याला उचलून घेतो आणि जमिनीवर अशापद्धतीने फेकतो, जसं की wwe ची फाईट आहे. डान्स करता करता अशी भलतीच स्टेप्स पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. आधी या दोघांची मजा-मस्ती सुरु आहे असं वाटेल, पण हे एकदाचं घडतंय असं नाही. ज्या तरुणासोबत हे घडतंय, ते पाहून तो सुद्धा दचकून जातोय.

पाहा व्हिडीओ :

हा भलता डान्स पाहून आणि तरुणाला फेकल्याचं पाहून सुरुवातीला तुम्हाला हसू येईल. पण नंतर तुम्हाला रागही येईल. ज्या व्यक्तीला खाली फेकून देण्यात आलं त्याने नेमकी काय चूक केली, असा प्रश्न तुम्हाला पडेल. मात्र, खाली फेकून देण्यात आलेल्या माणसाची कोणतीही चूक नसल्यामुळे लोक संतापले आहेत. नेटकऱ्यांनी चीड व्यक्त केली आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लोक या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

इतर बातम्या :

Video | चार मित्रांची बाईकवर सफर, पण मध्येच साप आला अन् भलतंच घडलं, पाहा व्हिडीओ

VIDEO: अमृता फडणवीस यांचं नवं गाणं ऐकलंत का?

VIDEO : फॉर्मल्सवर वायूवेगाने दोरीउड्या, फिटनेस फ्रीक गिरीशभाऊ कार्यकर्त्याच्या जीममध्ये

(boy funny dance video went viral video on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI