VIDEO: अमृता फडणवीस यांचं नवं गाणं ऐकलंत का?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 03, 2021 | 12:42 PM

Amruta Fadnavis | अमृता फडणवीस यांच्या आवाजातील गणेश वंदनेचा व्हिडीओ रिलीज करण्यात आला आहे. या गाण्यात अमृता फडणवीस पुन्हा एकदा पारंपरिक मराठमोळ्या वेशभुषेत पाहायला मिळत आहेत.

VIDEO: अमृता फडणवीस यांचं नवं गाणं ऐकलंत का?
अमृता फडणवीस

Follow us on

मुंबई: युनिक फॅशन सेन्स, गोड आवाज आणि राजकीय शेरेबाजीमुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांचं आणखी एक गाणं रिलीज झाले आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्ताने हे गाणं लाँच करण्यात आले आहे. अमृता फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच ही घोषणा केली होती. (Amruta Fadnavis new song)

अमृता फडणवीस यांच्या आवाजातील गणेश वंदनेचा व्हिडीओ रिलीज करण्यात आला आहे. या गाण्यात अमृता फडणवीस पुन्हा एकदा पारंपरिक मराठमोळ्या वेशभुषेत पाहायला मिळत आहेत. टाइम्स म्युझिक हब कंपनीच्या माध्यामातून हा व्हिडीओ प्रेक्षकांच्या समोर आला आहे. या व्हीडिओसाठी मी खूप उत्सुक होते. हा व्हीडिओ जसा मला कनेक्ट झाला आहे, तसा तुम्हालाही होईल, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली. आता अमृता यांच्या आतापर्यंतच्या गाण्यांप्रमाणे हे गाणेही हीट ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अमृता फडणवीसांचं इंग्रजी गाणं

यापूर्वी अमृता फडणवीस यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’साठी एक इंग्रजी गाणंही रिलीज केले होते. अमृता फडणवीस यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर आणि ट्विटरवर हे नवं गाणं पोस्ट केलं होतं. शक्ती हासिजा यांनी या गाण्याचं दिग्दर्शन केलं आहे. प्रसिद्ध इंग्रजी गायक लिओनेल रिचीनं हे मुळ गाणं गायलं आहे. या गाण्यात लिओनेलने एका संगीत शिक्षकाची भूमिका साकारली आहे. या गाण्यात तो एका अंध मुलीच्या प्रेमात पडल्याचंही दाखवण्यात आलं आहे. हेच गाणं आता अमृता फडणवीस यांनी गायलं आहे. त्यानंतर अमृता यांची ‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…’, ‘ये नयन डरे डरे’ ही गाणीही चांगलीच गाजली होती.

रोहित पवार म्हणाले, तुम्ही संधीचा योग्य फायदा उठवलात

महिला दिनाच्या मुहूर्तावर अमृता फडणवीस यांचे नवे गाणे प्रदर्शित झाले होते. हे गाणे ऐकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली होती. काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही, पण अमृताताईंनी मिळालेल्या संधीचा आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा, असे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

संबंधित बातम्या:

‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्तानं अमृता फडणवीसांचं इंग्रजी गाणं

VIDEO: अमृता फडणवीस यांचं हे नवं गाणं ऐकलंत का?

व्हॅलेंटाईनच्या दिवशी अमृता फडणवीसांचं नवं गाणं, आमदार महेश लांडगे म्हणतात, ‘नाईस व्हॉइस…!’

तयार राहा, माझं आणखी एक गाणं येतंय, अमृता फडणवीसांचा इशारा कोणाला?

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI