AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे विमानतळावर थरकाप उडवणारी घटना, विमानात 192 प्रवासी, लँडिंग गिअर निकामी, थेट 31000 उंचीवर..

पुण्यातून मोठी बातमी पुढे येत आहे. इंडिगो विमानाचे लँडिंग गिअर निकामी झाला. पुणे विमानतळावर इमर्जन्सी घोषित करण्यात आली. पुण्याहून गुवाहाटीकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात टेकऑफनंतर थेट हा तांत्रिक बिघाड झाला.

पुणे विमानतळावर थरकाप उडवणारी घटना, विमानात 192 प्रवासी, लँडिंग गिअर निकामी, थेट 31000 उंचीवर..
IndiGo flight
| Updated on: Nov 15, 2026 | 12:01 PM
Share

पुण्यातून मोठी बातमी पुढे येत आहे. इंडिगो विमानाचे लँडिंग गिअर निकामी झाला. पुणे विमानतळावर इमर्जन्सी घोषित करण्यात आली. पुण्याहून गुवाहाटीकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात टेकऑफनंतर तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळतंय. इंडिगोच्या 6E 0623 (VT-IZE) विमानाचे लँडिंग गिअर टेकऑफनंतर आत न गेल्याने खळबळ उडाली.  विमानाचे लँडिंग गिअर बाहेरच राहिल्याची वैमानिकाकडून एअर ट्रॅफिक कंट्रोलला माहिती दिली. विमानात प्रवासी आणि क्रूसह एकूण 192 जण होते. घटनेची माहिती मिळताच पुणे विमानतळ प्रशासनाकडून तातडीने हालचाली केल्या.  भारतीय हवाई दलाकडून पुणे विमानतळावर फुल इमर्जन्सी घोषित करण्यात आली. अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.

लँडिंग गिअरची स्थिती तपासण्यासाठी विमानाने धावपट्टीवरून लो पास घेतला. सर्व यंत्रणांच्या समन्वयातून सकाळी 9 वाजून 4 मिनिटांनी विमानाचे पुणे विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यात आले. तीन अग्निशमन वाहने आणि दोन रुग्णवाहिकांच्या सुरक्षेत विमान बे क्रमांक 7 वर हलवण्यात आले. विमान सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतर सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी फुल इमर्जन्सी मागे घेण्यात आली.

एरोब्रिज जोडून सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे विमानातून बाहेर काढले. विमानातील 192 प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. सर्वच प्रवासी सुरक्षित आहेत. प्रवाशांना गुवाहाटीला पोहोचवण्यासाठी इंडिगोकडून बंगळुरूहून पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली. पुणे विमानतळ प्रशासन, भारतीय हवाई दल, एटीसी आणि इंडिगोच्या समन्वयातून मोठी आपत्कालीन मोहीम यशस्वी केली. साधारणपणे अंदाजे 31000 उंचीवर विमान होते.

लँडिंग गिअरमधील तांत्रिक बिघाडामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मात्र, काही काळ गोंधळाची स्थिती बघायला मिळाली. प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण होते. अहमदाबादहून लंडनकडे निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात झाला. विमानातील फक्त एकच प्रवासी जिवंत वाचला. त्यातच काही दिवसांपूर्वी जयपूरच्या विमानतळावर एका एअर इंडियाच्या विमानाची आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. त्यातच आज पुणे विमानतळावर इंडिगोच्या विमानाची आपत्कालीन लँडिंग करण्यात आली.

Follow Us
ऑपरेशन टायगरवर संजय राऊतांचं मोठं विधान; सत्तेच्या फेविकॉलमुळे हे....
Sanjay Raut : ऑपरेशन टायगरवर संजय राऊतांचं मोठं विधान; सत्तेच्या फेविकॉलमुळे हे....
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार!
Jaykumar Gore : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार! पहिलं अध्यक्षपद...; जयकुमार गोरेंचं मोठं विधान
पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? राजकीय....
NCP Politics : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला पूर्णपणे ब्रेक; पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
राऊतांच्या वाढदिवशी मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी
Sanjay Raut Birthday : संजय राऊतांच्या वाढदिवशी मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी; महाराष्ट्रभरातून आलेल्या समर्थकांकडून शुभेच्छांचा वर्षाव
सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले, तरी साईभक्तांची श्रद्धा कायम....
Shirdi Sai Baba Donation : सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले, तरी साईभक्तांची श्रद्धा कायम; वर्षभरात साईचरणी 14.5 किलो सोने आणि 255 किलो चांदी अर्पण
सशस्त्र माओवादापेक्षा दिमागी माओवाद अधिक धोकादायक; फडणवीसांचं विधान...
Devendra Fadnavis : सशस्त्र माओवादापेक्षा दिमागी माओवाद अधिक धोकादायक; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, असं का म्हणाले?
अंबरनाथमध्ये ब्लिंकिटची सेवा आठ दिवसांपासून ठप्प, पगार कपात अन्...
Blinkit Riders Strike : अंबरनाथमध्ये ब्लिंकिटची सेवा आठ दिवसांपासून ठप्प, पगार कपात अन्...; 100 ते 150 रायडर्सचा संप
टोरंट प्रकल्पासाठी कर्जतच्या 150 शेतकऱ्यांना नोटीस; 25 नोव्हेंबरला....
Karjat Torrent Power Project : टोरंट प्रकल्पासाठी कर्जतच्या 150 शेतकऱ्यांना नोटीस; 25 नोव्हेंबरला संयुक्त मोजणी
36 तासांनंतर मायक्रोसॉफ्टच्या सेवा पूर्ववत; कंपनीने ट्विट करत दिली....
Microsoft Services Outage : 36 तासांनंतर मायक्रोसॉफ्टच्या सेवा पूर्ववत; कंपनीने ट्विट करत दिली माहिती
लातूर जिल्हा बँकेसाठी आज मतदान; सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनलमध्ये थेट..
Latur District Bank Election : लातूर जिल्हा बँकेसाठी आज मतदान; सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनलमध्ये थेट लढत, दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला