SHARE MARKET UPDATE: शेअर बाजारात घसरणीचं सत्र, सलग 6 व्या दिवशी बाजार गडगडला; गुंतवणुकदार अस्वस्थ

आज सेन्सेक्स 69 अंकांच्या घसरणीसह 57,232 वर बंद झाला. निफ्टी 29 अंक अंकांच्या घसरणीसह 17063 वर पोहोचला. सेन्सेक्स 30 पैकी 17 शेअर वर घसरण झाली.

SHARE MARKET UPDATE: शेअर बाजारात घसरणीचं सत्र, सलग 6 व्या दिवशी बाजार गडगडला; गुंतवणुकदार अस्वस्थ
शेअर बाजारात नेमकं काय घडतंय?
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Feb 23, 2022 | 7:07 PM

मुंबईरशिया-युक्रेन वादामुळे सलग 6 व्या दिवशी शेअर (SHARE MARKET)बाजारात घसरण नोंदविली गेली. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर (SHARE MARKET UPDATE) कायम राहिला. गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेले घसरणीचे सत्र आज (बुधवारी) कायम राहिले. दिवसभरात सातत्यपूर्ण कामगिरीच्या अभावामुळे सेंन्सेक्स व निफ्टी मध्ये घसरण नोंदविली गेली. सेसेक्सवर 50 अंकांहून अधिक घसरण झाली. तर, निफ्टी 17050 अंकांच्या नजीक बंद झाला. आज निफ्टी वर मेटल इंडेक्स (METAL INDEX) 2 टक्क्यांनी घसरला. पीएसयू बँक, फार्मा आणि रिअल्टी शेयरवर विक्रीचा दबाव कायम राहिला. आज सेन्सेक्स 69 अंकांच्या घसरणीसह 57,232 वर बंद झाला. निफ्टी 29 अंक अंकांच्या घसरणीसह 17063 वर पोहोचला. सेन्सेक्स 30 पैकी 17 शेअर वर घसरण झाली.

आजचे वधारणीचे शेअर्स:

• कोटक महिंद्रा(2.41)
•टायटन कंपनी(1.86)
•इंड्सइंड(1.24)
•टाटा कॉन्स प्रॉ (1.13)
•मारुती सुझुकी(0.88)

आजचे घसरणीचे शेअर्स:

•ओएनजीसी (-2.55)
•हिरो मोटोकॉर्प(-2.21)
•एनटीपीसी(-1.44)
•लार्सेन (-1.31)
•जेएसडब्ल्यू स्टील (-1.17)

वाद मिटेना, गुंतवणुकदार अस्वस्थ-

गेल्या आठवड्याभरात युक्रेन-रशिया वादाचे पडसाद भारतासह आंतरराष्ट्रीय अर्थजगतावर उमटत आहे. रशिया-युक्रेनच्या वादात युरोपीय राष्ट्रांनी उडी घेतली आहे. रशियाच्या आक्रमक पवित्र्यामुळे युद्धाचे ढग निर्माण झाले आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. युक्रेन-रशिया वादामुळे गुंतवणुकदारांवर अनिश्चिततेचं सावट आहे.

तेलाच्या तुटवड्याचं संकट?

कच्च्या तेलाच्या भाववाढीला रशिया-युक्रेन संकटाच कारण सांगितलं जातं. रशियाच्या युक्रेनसोबतच्या संबंधामुळे युरोपियन राष्ट्र आणि अमेरिका रशियाची आर्थिक नाकेबंदी करण्याची शक्यता आहे. यामुळे तेल पुरवठ्यावर थेट परिणाम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अनेक राष्ट्रांनी प्रतिबंधात्मक मार्ग म्हणून इंधनाचे साठे करण्याचे निर्देश जारी केले आहेत

बिल्डरकडून घराचा ताबा मिळत नाही? तुमच्या मदतीला थेट सुप्रीम कोर्ट, हा महत्वपूर्ण निर्णय….

‘पीएमजेजेबीवाय पॉलिसीधारकांना ‘आयपीओ’त सूट?, अध्यक्षांच्या विधानावर एलआयसीचे स्पष्टीकरण

पॉलिसी मॅच्युरिटीनंतर किती कर द्यावा लागतो? आयुर्विम्याबाबत जाणून घ्या ‘या’ महत्त्वपूर्ण गोष्टी