सुकन्या समृद्धी योजना 2021 : रोज 100 रुपयांच्या बचतीतून मिळणार 15 लाख! सप्टेंबरपर्यंत मोठी संधी

| Updated on: Jul 02, 2021 | 1:12 PM

सुकन्या समृद्धी योजना केंद्र सरकारने वर्ष 2015 मध्ये लॉन्च केली होती. या माध्यमातून मुलींचं शिक्षण, लग्न आणि अन्य खर्चासाठी एक ठराविक रक्कम जमा केली जाऊ शकेल.

सुकन्या समृद्धी योजना 2021 : रोज 100 रुपयांच्या बचतीतून मिळणार 15 लाख! सप्टेंबरपर्यंत मोठी संधी
सुकन्या समृद्धी योजना
Follow us on

मुंबई : केंद्र सरकारने जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. यासोबतच आता सुकन्या समृद्धी योजनेवर मागील तिमाही एवढंच व्याज मिळत आहे. सुकन्या समृद्धी योजना केंद्र सरकारच्या बचत योजनांपैकी एक आहे. या योजनेत मुलींसाठी एका ठराविक वयापर्यंत टॅक्स फ्री गुंतवणूक केली जाऊ शकते. इनकम टॅक्स अॅक्टच्या सेक्शन 80 सी नुसार ही सूट दिली जाते. करातील ही सूट एका वर्षाच्या अधिकाधिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळते. (Get Rs 15 lakh by saving Rs 100 per day through Sukanya Samrudhi Yojana)

सुकन्या समृद्धी योजना केंद्र सरकारने वर्ष 2015 मध्ये लॉन्च केली होती. या माध्यमातून मुलींचं शिक्षण, लग्न आणि अन्य खर्चासाठी एक ठराविक रक्कम जमा केली जाऊ शकेल. अन्य योजनांच्या तुलनेत पाहायला गेलं तर या योजनेत जास्त व्याज मिळते. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत या योजनेवर वर्षाकाठी 7.6 टक्के दराने व्याज मिळेल. यावर मिळणारे व्याज वार्षिक हिशेबाने कम्पाऊंड होतं.

30 सप्टेंबरपूर्वी पहिल्या गुंतवणुकीवर 7.6 टक्के व्याज मिळणार

योग्य पद्धतीने या योजनेत गुंतवणूक केल्यास मुलींसाठी मोठी गुंतवणूक केली जाऊ शकते. 30 सप्टेंबरपूर्वी या योजनेत गुंतवणूक केल्यास मॅच्युरिटीला 15 लाख रुपये मिळू शकतात. मॅच्युरिटीची रक्कम त्याच व्यक्तीला काढता येईल ज्या व्यक्तीच्या नावे गुंतवणूक केली जाईल.

रोज 100 रुपयांच्या बचतीद्वारे 15 लाख रुपये

एखादी व्यक्तीने या योजनेत प्रत्येक महिन्याला 3 हजार रुपये गुंतवणूक केल्यास, एका वर्षाला ती 36 हजार रुपये होईल. 14 वर्षे गुंतवणूक केल्यानंतर त्यावरील 7.6 टक्के व्याजदरानुसार 9 लाख 87 हजार 637 रुपये होतात. या योजनेच्या नियमानुसार मुलगी 21 वर्षाची झाल्यानंतर सुकन्या समृद्धी अकाऊंटची मॅच्युरिटी पूर्ण होते. अशावेळी मुलीचं वय 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 15 लाख 27 हजार 637 रुपये मिळतात.

कसे अॅक्टिव्ह कराल सुकन्या समृद्धी खाते?

पोस्ट ऑफिसच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, जर एखाद्याचे खाते निष्क्रिय झाले तर ग्राहकास त्याच्या पोस्ट ऑफिसच्या शाखेत जावे लागेल. यानंतर आपल्याला पुन्हा खाते सुरू करण्यासाठी एक फॉर्म भरावा लागेल. तसेच जेवढी वर्षे किमान पेमेंट थकले असेल ते भरावे लागेल. समजा तुमचे खाते दोन वर्षांपासून चालू नसेल तर तुम्हाला दोन वर्षाचे मिनिमम पेमेंट 500 रुपये आणि 100 रुपये दंड भरावे लागेल. एकूण 600 रुपये द्यावे लागतील. असे केल्यावर आपले खाते पुन्हा सक्रिय केले जाईल.

इतर बातम्या :

PF Account : ‘या’ कारणामुळे तुमच्या पीएफ अकाऊंटमध्ये नॉमिनी असणं गरजेचं, काय आहेत फायदे?

PF अकाऊंट ट्रान्सफर करताता ‘या’ गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा अर्धेच पैसे येतील

Get Rs 15 lakh by saving Rs 100 per day through Sukanya Samrudhi Yojana