बेरोजगारांना मोदी सरकारची मदत, केंद्राच्या योजनेतंर्गत मिळवा 50 टक्के वेतन

Atal Bimit Vyakti Kalyan Yojana | अटल बिमीत कल्याण कल्याण योजनेअंतर्गत, नोकरी गमावलेल्या संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सरकारकडून आर्थिक मदत मिळते. हा एक प्रकारचा बेरोजगारी भत्ता आहे, ज्याचा लाभ फक्त त्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध आहे जे ईएसआय योजनेअंतर्गत येतात

बेरोजगारांना मोदी सरकारची मदत, केंद्राच्या योजनेतंर्गत मिळवा 50 टक्के वेतन
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 2:45 PM

नवी दिल्ली: कोरोनाकाळात देशातील अनेक उद्योगधंदे बंद झाल्याने लाखो व्यक्ती बेरोजगार झाल्या आहेत. अशा बेरोजगार व्यक्तींना आर्थिक दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने अटल बिमीत व्यक्ती कल्याण योजना सुरु केली होती. कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ईएसआयसी) ‘अटल बीमित व्याक्ती कल्याण योजनेची’ मुदत 30 जून 2022 पर्यंत वाढवली आहे. या योजनेअंतर्गत औद्योगिक कामगारांना बेरोजगारी भत्ता दिला जातो. कोविड -19 साथीच्या काळात नोकरी गमावलेल्या कामगारांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे योजनेचे उद्दिष्ट आहे.

अटल बिमीत कल्याण कल्याण योजनेअंतर्गत, नोकरी गमावलेल्या संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सरकारकडून आर्थिक मदत मिळते. हा एक प्रकारचा बेरोजगारी भत्ता आहे, ज्याचा लाभ फक्त त्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध आहे जे ईएसआय योजनेअंतर्गत येतात. म्हणजेच ESI योगदान त्यांच्या मासिक पगारातून कापले जाते. योजनेअंतर्गत, बेरोजगार झाल्यानंतर, सरकारकडून जास्तीत जास्त 90 दिवस म्हणजे तीन महिने आर्थिक मदत दिली जाते. नोकरी गेल्यानंतर 30 दिवसांनी संबंधित व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करु शकते.

50 हजार बेरोजगांना मिळाला लाभ

कोविड -19 च्या उद्रेकापासून आतापर्यंत 50 हजारापेक्षा अधिक लोकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. कोणत्याही कारणामुळे नोकरी गमावलेल्या विमाधारकांना तीन महिन्यांसाठी 50 टक्के पगारावर बेरोजगारी भत्ता देण्याची ही योजना आहे. विमाधारक अंतिम नियोक्ताद्वारे दावा पुढे पाठवण्याऐवजी थेट ईएसआयसी शाखा कार्यालयात दावा सादर करू शकतो आणि तो थेट ग्राहकाच्या बँक खात्यात जमा केला जातो. कामगार मंत्रालयाच्या अंतर्गत दोन सर्वात मोठ्या सामाजिक सुरक्षा संस्थांपैकी एक असलेल्या ईएसआयसीच्या बोर्ड बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) 185 व्या बैठकीत अटल बिमीत कल्याण कल्याण योजना जून 2022 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ABVKY चा लाभ ज्यांनी नोकरी गमावली आहे त्यांना मिळेल.

या बैठकीत कर्नाटकातील हारहोली आणि नरसापूर येथे प्रत्येकी 100 खाटांची दोन नवीन ईएसआयसी रुग्णालये, केरळसाठी सात नवीन ईएसआयसी दवाखाने, इतर गोष्टींसह, पाच एकर जमीन संपादित करण्यास मान्यता जाहीर केली.

आधारकार्ड UAN नंबरशी लिंक करण्याची मुदत 1 डिसेंबरपर्यंत वाढवली

केंद्र सरकारकडून भविष्य निर्वाह निधीसाठी (EPFO) वापरल्या जाणारा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आणि आधार कार्ड (Aadhaar number) लिंक करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. त्यानुसार आता नोकरदारांना या दोन्ही गोष्टी लिंक करण्यासाठी 1 डिसेंबरपर्यंतचा अवधी मिळाला आहे. यापूर्वी EPFO ने नोकरदारांना या कामासाठी 1 सप्टेंबरपर्यंतचा अवधी देऊ केला होता. त्यानंतर UAN नंबर आणि आधार लिंक नसल्यास पीएफची रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार नाही, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे तुर्तास नोकरदारांना दिलासा मिळाला आहे.

संंबंधित बातम्या:

नोकरदार, मजुरांसाठी मोठी बातमी, सामाजिक सुरक्षा संहिता लवकरच लागू होणार, श्रमिकांना काय फायदा?

आपणही PF खातेधारक असाल तर ‘हे’ काम लवकर करा, अन्यथा पैसे काढता येणार नाही

UAN नंबर ॲक्टिव्हेट करण्याची सोपी पद्धत, काही वेळामध्ये चेक करा तुमचा पीएफ बॅलन्स

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.