आपणही PF खातेधारक असाल तर ‘हे’ काम लवकर करा, अन्यथा पैसे काढता येणार नाही

मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाहनिधी संस्थेच्या (EPFO) प्रक्रियेविषयी अनेकजण अनभिज्ञ असल्याचे पाहायला मिळते. पूर्ण माहिती नसल्याने अनेकांना आपला हक्काचा भविष्य निर्वाहनिधी (PF) काढण्यात अडचणी येतात. मात्र, काही महत्त्वाची खबरदारी घेतल्यास आपल्याला पीएफविषयी दैनंदिन माहिती मिळवणे सोप होऊ शकते. तसेच वेळ पडल्यास अगदी कमी वेळेत हा निधी उपलब्धही होऊ शकतो. साधारणपणे 50 टक्के लोक असे आहेत […]

आपणही PF खातेधारक असाल तर 'हे' काम लवकर करा, अन्यथा पैसे काढता येणार नाही
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाहनिधी संस्थेच्या (EPFO) प्रक्रियेविषयी अनेकजण अनभिज्ञ असल्याचे पाहायला मिळते. पूर्ण माहिती नसल्याने अनेकांना आपला हक्काचा भविष्य निर्वाहनिधी (PF) काढण्यात अडचणी येतात. मात्र, काही महत्त्वाची खबरदारी घेतल्यास आपल्याला पीएफविषयी दैनंदिन माहिती मिळवणे सोप होऊ शकते. तसेच वेळ पडल्यास अगदी कमी वेळेत हा निधी उपलब्धही होऊ शकतो.

साधारणपणे 50 टक्के लोक असे आहेत ज्यांनी आपल्या पीएफ खात्याच्या केवायसी (KYC) पूर्ण केलेल्या नसतात. केवायसीमध्ये आपल्या ओळखीची निश्चिती करणारी माहिती द्यावी लागते. ती पीएफ यूनिवर्सल अकाउंट नंबरला (UAN) जोडलेली असते. असे झाल्यास पीएफ खातेधारकाला नियमितपणे पीएफची माहिती व स्थितीचे अपडेट मिळतात. मात्र, ही प्रकिया पूर्ण केलेली नसेल, तर मात्र या सेवांचा वापर करता येत नाही.

मागील काही वर्षांपासून केवायसी पूर्ण करण्याची कवायत सुरु आहे. सरकारने ईपीएफओच्या अखत्यारीत असलेल्या सर्व कंपन्यांना आपल्याकडील 100 टक्के कर्मचाऱ्यांच्या यूएएन आणि केवायसीला संलग्न करण्याचे निर्देश दिले आहेत. हे करणे अनिवार्य असून असे न करणे दंडात्मक गुन्हा ठरवण्यात आले आहे.

केवायसी करण्याचे फायदे

ज्या खात्यांची केवायसी कागदपत्रांची पूर्तता झाली आहे, त्या खातेधारकांना पीएफच्या व्यवहारांमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. मात्र, ही माहिती अद्ययावत आणि संलग्न केली नाही, तर मात्र ‘क्लेम रिक्वेस्ट’ नाकारलीही जाऊ शकते. तसेच पीएफ खात्याच्या कोणत्याही व्यवहाराची माहिती एसएमएसद्वारे मिळणार नाही.

केवायसीची प्रक्रिया कशी पूर्ण करणार

केवायसी संबंधित कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ईपीएफ सदस्याला कोठेही जाण्याची गरज नाही. ईपीएफओ यूएएन पोर्टल https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर जाऊन खातेधारकाला आपल्या केवायसी संबंधित कागदपत्रांची माहिती अद्ययावत करता येईल. सर्वात आधी पोर्टलवर जाऊन केवायसीचा पर्याय निवडायचा. तेथे पॅन क्रमांक, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, बँक खाते याची माहिती भरायची. यानंतर आपले पॅन आणि आधार पीएफ खात्याशी संलग्न होईल. मात्र, संबंधित माहिती नोकरी देणाऱ्या कंपनीकडून तपासून खातरजमा होणे अत्यावश्यक आहे. कंपनीकडून खातरजमा होताच खातेधारकाला ईपीएफओच्या सर्व सुविधांचा उपयोग करता येईल.

3 दिवसात पैसे काढता येणार केवायसी पूर्ण असल्यास ऑनलाइन क्लेम सेटलमेंटनंतर 3 दिवसांमध्येच आपल्याला पैसे काढता येतील. अर्जानंतर ईपीएफओ आपली पीएफ काढण्याची प्रक्रिया तत्काळ सुरु करते. त्यानंतर पीएफचे पैसे थेट आपल्या खात्यात जमा होतात.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.