Currency Note : नोटावरील फोटो हटवायचा? पंतप्रधान, राष्ट्रपती की आणखी कोणी, निर्णय कोणाचा?

| Updated on: Oct 26, 2022 | 10:24 PM

Currency Note : नोटावरील छायाचित्रावरुन देशात महाभारत सुरु आहे, पण नोटा छापण्याचा नेमका अधिकार कोणाचा आहे?

Currency Note : नोटावरील फोटो हटवायचा? पंतप्रधान, राष्ट्रपती की आणखी कोणी, निर्णय कोणाचा?
नोटा छापण्याचा अधिकार कोणाचा?
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी भारतीय चलनी नोटावर (Currency Note) देवी-देवतांचे फोटो (Photos of Gods)छापण्याची मागणी केली. केजरीवाल यांच्या या हिंदूकार्डने भारतीय जनता पार्टीला (BJP)चेकमेट मिळाल्याची चर्चा आहे. तर देशभरात हाच मुद्दा चर्चेत होता. पण यातून एक बाब समोर आली ती म्हणजे, अखेर भारतीय चलनी नोटांवर फोटो छापण्याचा आणि काढण्याचा अधिकार नेमका आहे तरी कोणाला?

याविषयी कमोडिटी एक्सपर्ट अजय केडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात सर्वप्रकारच्या नोटा छापण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया घेते. परंतु, यामध्ये केंद्र सरकारची सहमती आवश्यक असते.

नोटेवर कोणाचा फोटो लावायचा अथवा काढायचा याविषयीचा निर्णय रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकार यांचे संयुक्त पॅनल घेते. रिझर्व्ह बँकेच्या कायद्यात नोटेवर छायाचित्र छापण्याविषयी अधिनियम तयार करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

आरबीआयकडे याविषयी माहिती अधिकारात माहिती मागविण्यात आली होती. आरबीआय अॅक्ट 1934 च्या नियम 25 अंतर्गत केंद्रीय बँक आणि केंद्र सरकार मिळून नोट आणि त्यावरील छायाचित्राविषयीचा निर्णय घेते.

छायाचित्र बदलवायचे असेल अथवा काढायचे असेल, नवीन फोटो लावायचा असेल तर याविषयीचा निर्णय केंद्रीय बँक अथवा केंद्र सरकार एकट्याने हा निर्णय घेत नाही. संयुक्तरित्या हा निर्णय घेते.

वास्तविक, नोटेवर कोणाचे छायाचित्र असावे हा निर्णय नियमाना धरुन न राहता राजनितीने अधिक प्रेरित असतो. यामध्ये केंद्र सरकार अधिक हस्तक्षेप करतो, हे स्पष्ट आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नाव नोटेवरुन हटविण्याची मागणी काही पहिल्यांदा झाली नाही. यापूर्वीही अनेकदा ही मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी दस्तुरखुद्द मोदी सरकारनेच नोटेवरुन महात्मा गांधींचा फोटो हटविण्याची मागणी केली होती.

2016 मध्ये महात्मा गांधींचा फोटो हटवून त्याठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र लावण्याची मागणी करण्यात आली होती. पण नंतर केंद्र सरकारने यावर कुठलाच निर्णय घेतला नाही.

जून 2022 मध्ये आरबीआयने महात्मा गांधीजींच्या फोटोसह डॉ. आंबेडकर आणि डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा वॉटरमार्क लावण्याची गोष्ट केली. त्यांनी आयआयटी, दिल्लीला याविषयीचे डिझाईन तयार करायला सांगितले होते.

भारतीय नोटांवर 1966 पासून गांधींजा फोटो लावण्यात येत आहे. त्यापूर्वी नोटावर राष्ट्रीय प्रतिक अशोक स्तंभ, रॉयल बंगाल टायगर, आर्यभट्ट उपग्रह, शेती, शालीमार गार्डन यांचेही छायाचित्र छापण्यात आलेले आहेत.