Corona Vaccine | देशात लसीकरणाचा नवा विक्रम, पंतप्रधान मोदींनी ट्विट करुन केलं अभिनंदन

देशात लसीकरणाचा विक्रम. शुक्रवारी दिवसभरात देशातील 1 कोटी नागरिकांना लस देण्यात आली. आतापर्यंत देशातील 62 कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. दोन दिवसांत मिळून नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये तब्बल 21 हजारांची वाढ झाली असताना काहीसा दिलासा मिळाला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Rohit Dhamnaskar

Aug 28, 2021 | 8:22 AM

देशात लसीकरणाचा विक्रम. शुक्रवारी दिवसभरात देशातील 1 कोटी नागरिकांना लस देण्यात आली. आतापर्यंत देशातील 62 कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. दोन दिवसांत मिळून नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये तब्बल 21 हजारांची वाढ झाली असताना काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण गुरुवारी आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत 2 हजारांनी घट झाली होती. गुरुवारी दिवसभरात 44 हजार 658 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 496 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. मात्र कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें