‘या’ वर्षापर्यंत मुंबईला समुद्र गिळणार? अभ्यासात चिंता वाढवणारं सत्य समोर
वेळेवर धावणाऱ्या मुंबईच्या अनेक कहाण्या आहेत. मायानगरी अशी ‘माझी मुंबई’... मात्र याच मुंबईबद्दल धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई शहर आणि चेन्नई शहराची १० टक्के जमीन समुद्र गिळण्याचा धोका निर्माण झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार २०४० पर्यंत मुंबईची १० टक्के जमीन समुद्र गिळंकृत करणार आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे.
मुंबई हे शहर स्वप्ननगरी म्हणून ओळखली जाते. मुंबई हे शहर असं आहे, जिथे कोणीही उपाशी राहत नाही. वेळेवर धावणाऱ्या मुंबईच्या अनेक कहाण्या आहेत. मायानगरी अशी ‘माझी मुंबई’… मात्र याच मुंबईबद्दल धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई शहर आणि चेन्नई शहराची १० टक्के जमीन समुद्र गिळण्याचा धोका निर्माण झाला आहे. बदलत्या हवामानाचा फटका मुंबई आणि चेन्नई या शहराला बसणार असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. हवामान बदलामुळे समुद्राची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. २०४० पर्यत १० टक्के जमीन पाण्याखाली जाण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. सेंटर फॉर स्टडी ऑफ सायन्सने एक अभ्यास केला. या केलेल्या अभ्यासातून हे वास्तव समोर आले आहे. या अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार २०४० पर्यंत मुंबईची १० टक्के जमीन समुद्र गिळंकृत करणार आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे.
जो देश शक्तिशाली असतो, तोच जगात शांतता निर्माण करू शकतो - CM फडणवीस
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एकुलता एक मुलगा गमावला, हतबल आईला....
आदिती तटकरेंचे सचिव महिलांसोबत अर्वाच्च भाषेत... रोहिणी खडसेंचा खळबळजन
आम्ही घरी जाऊन पाठिंबा दिला म्हणून तुम्ही मुख्यमंत्री बनलात...
