100 SuperFast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 28 July 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेलं आक्षेपार्ह विधान आणि त्यानंतर राणेंना झालेली अटक व सुटका, यावरुन राज्यातील राजकीय वातावरुन ढवळून निघालं आहे. अशावेळी राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असं चित्र पाहायला मिळत आहेत. 

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Nupur Chilkulwar

Aug 28, 2021 | 9:51 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेलं आक्षेपार्ह विधान आणि त्यानंतर राणेंना झालेली अटक व सुटका, यावरुन राज्यातील राजकीय वातावरुन ढवळून निघालं आहे. अशावेळी राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असं चित्र पाहायला मिळत आहेत. नारायण राणे आणि शिवसेना नेत्यांमध्ये आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांनाही सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नारायण राणेंना खोचक टोला लगावलाय. तसंच प्रत्येकानं भान ठेवून वक्तव्य केली तर असे प्रसंगच आले नसते, अशी टीकाही अजित पवार यांनी केलीय.

राज्यात सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपांपेक्षा राणेंनी त्यांच्या खात्याकडून राज्यासाठी निधी आणला तर योग्य राहिल, तुम्ही काय सांगाल? असा प्रश्न एका पत्रकाराने अजित पवार यांना विचारला त्यावर ‘सुक्ष्म आणि लहानमध्ये काय निधी मिळणार आहे? निधी द्यायचा झाला तर गडकरी साहेबांचा विभाग देऊ शकतं. गडकरींनी यापूर्वीही दिला आहे. कामंही चाललेली आहेत. सध्या कोरोनाचं संकट असल्यामुळे सुक्ष्म आणि लघू असे उद्योग खूप अडचणीत आले आहेत. देशपातळीवर याबाबत मोठा निर्णय घेता येत असावा. तुम्हाला आठवत असेल की कोरोनाच्या पहिल्या लाटेत अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी 25 लाख कोटीचं पॅकेज दिलं होतं. त्यात किती फायदा झाला, झाला की नाही? हा संशोधनाचा भाग आहे’, असं खोचक उत्तर अजित पवार यांनी दिलं.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें