नागपूरातील क्रीडा घोटाळ्यातील 104 जण निर्दोष
महानगरपालिकेत झालेल्या या घोटाळ्यात महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि पुरवठादारही होते, तसेच यामध्ये उपमहापौरांचाही समावेश होता.
नागपूरमध्ये झालेला क्रीडा घोटाळा आणि त्यानंतर तो विषय न्यायालयात दाखल झाल्यानंतर 24 वर्षानंतर या घोटाळ्याचा निकाल लागला आहे. महानगरपालिकेत झालेल्या या घोटाळ्यात महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि पुरवठादारही होते, तसेच यामध्ये उपमहापौरांचाही समावेश होता. याप्रकरणी कृष्णाजी खोपडे, अर्चना डिंगारे, सविता काळे, बळवंत जिचकर, माजी नगरसेवक, उपमहापौर, महानगरपालिकेचे अधिकारी आणि पुरवठादारांची तपासणी घेण्यात आली होती. आज न्यायालयाने याबाबत निकाल दिला असून या प्रकरणातील 104 जणांची सुटका करण्यात आली आहे. 108 पैकी 101 जणांची सुटका झाली असून त्यातील सात जणांचा मृत्यू झाला असून हा खटला दीर्घकाळ चालला असल्याने याची जोरदार चर्चा होती.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

