शिंदे-फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पात गड-किल्ले संवर्धनासाठी किती कोटींची तरतूद, काय केली घोषणा
VIDEO | देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून पहिलाच अर्थसंकल्प विधानसभेत सादर, बघा काय केल्या मोठ्या घोषणा
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून पहिलाच अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात गड किल्ले प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण यंदाच्या अर्थसंकल्पात शिवकालीन गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे यंदा 350 वे वर्ष आहे. या महोत्सवासाठी राज्य सरकारकडून 350 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असून आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पनेवर आधारित उद्यानासाठी 50 कोटी रूपये आणि मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्याने उभारण्यासाठी 250 कोटी रुपये यासह शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर आधारित संग्रहालय आणि शिवकालीन किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 300 कोटी रुपये सरकार देणार असल्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने केली.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले

