वन खात्यात बदल्यांसाठी तब्बल 35 लाख? ऑडिओ क्लिपनंतर खळबळ, नेमकं प्रकरण काय?
अमरावतीमध्ये वन खात्यात बदल्यांसाठी 35 लाख रुपये घेत असल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या संदर्भात वनमंत्र्यांकडे तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. तर सरकारकडून कारवाई करण्यात येईल असं आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे.
वनविभागातील बदल्यांमध्ये आर्थिक अनियमिततेचे एक गंभीर प्रकरण आता समोर आलं आहे. अमरावती सर्कल वनविभागातील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी पैसे घेतल्याचा आरोप होतो आहे. एका व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे खळबळ उडाली आहे. नोकरीसाठी 35 लाख रुपये देण्यास तयार असल्याचा उल्लेख या ऑडिओ क्लिपमध्ये आहे. तर दुसऱ्या बाजूची व्यक्ती बदलीसाठी यावर्षी रेट वाढल्याचं सांगतो आहे.
व्हायरल ऑडिओत नेमंक काय म्हटलं?
‘सर RFO च्या ऑर्डर झाल्या का? जाऊदे आमचं झालं नाही आता, जाऊदे कुठे मीठ चोळता. नेमका प्रॉब्लेम काय झाला? प्रॉब्लेम काय? पैसे देत नाहीत, काय झालं? पैसे म्हणजे मित्रांनी कबूल केले होते, 35 लाख रुपयापर्यंत आहे म्हटलं, त्याच्यापुढे लय जास्त रेट गेले यावेळेस, म्हणता औकात नाही आपली कॅन्सल करून टाकली. 35 लाखांच्या वर आहे, अरे बापरे लय जास्त झाले. खरंच जास्त झालं पण जाऊदे आता’, असा संवाद या क्लिप म्ध्ये ऐकायला येतोय. तर या ऑडिओची टीव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही.

पुण्यात दादांचं भाषण सुरू अन् 'प्रहार'च्या कार्यकर्त्यानी घातला गदारोळ

पुढील 24 तास धोक्याचे... या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, IMDचा अलर्ट काय?

16 तारखेपासून अन्नत्यागच नाहीतर तर आता... बच्चू कडूंची मोठी घोषणा काय?

मी काय येडगावहून आलोय? नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भुजबळ भडकले
