Vaishnavi Hagawane Case : सूनेची आत्महत्या अन् सासऱ्याचा मटणावर ताण, वैष्णवीचा मृतदेह पाहून हगवणे फरार; बघा कुठं-कुठं लपला?
वैष्णवी हगवणेच्या फरार सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला पहाटे साडेचार वाजता अटक झाली. कोर्टाना या दोघांना २८ तारखेपर्यंत कोठडी सुनावली. पण राजेंद्र हगवणेचा निर्लज्जपणाही समोर आला. फरार असताना तो मटणावर ताव मारत होता आणि ते फुटेजही समोर आले.
सून वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर सात दिवस फरार झालेला सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना काल पहाटे साडेचार वाजता पोलिसांनी स्वारगेट परिसरातून उचललं. वैष्णवीने आत्महत्या नाही तर दोन कोटीच्या हुंड्यासाठी हत्या केल्याचा आरोप होता. सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे फरार होते. पण फरार असतानाही सुनेच्या मृत्यूच सासरा आणि दिरांना काहीही देणं घेणं नव्हतं. हे या व्हिडीओतून स्पष्ट झालं. फरार असताना आरोपी हगवणे पिता-पुत्र हॉटेलला मटणावर ताव मारत होते. तळेगाव दाभाडीतील पांढरा तांबडा रस्ता हॉटेलमध्ये मटण खातानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं.
म्हणजेच पुणे जिल्ह्यात हॉटेलमध्ये बिना दिक्कत राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे फिरत होते. पण पोलिसांना कानोकान खबर लागली नाही. जेवण झाल्यानंतर आरामात हगवणे बाहेर पडला. काळ्या रंगाच्या थार गाडीत ऐटीत बसून पुढे आणखी फरार झाला. पुणे पोलिसांच्या सहा सहा पथकाकडून हगवणेचा शोध सुरू होता. वैष्णवीचा आरोपी सासरा राजेंद्र हगवणे सात दिवस आधी पुण्याहून कोल्हापूर, कोल्हापूरहून पुन्हा पुण्यातील पावना डॅम, तळेगाव दाभाडे आणि स्वारगेट अशा ठिकाणी लपला. आलिशान गाड्या बदलत हगवणे पितापुत्र फरार होत राहिले. पण पहाटे साडेचार वाजता राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेच्या मुसक्या आवळल्या. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट..

पवारांची राष्ट्रवादी हा एक मोठा पक्ष सोडून कुणाशीही युती करण्यास तयार?

बावनकुळेंनी घेतली बच्चू कडूंची भेट तर फोनवरून फडणवीसांचं मोठं आश्वासन

अपघातात वडिलांचा मृत्यू, ओळख पटवण्यासाठी 8 महिन्याच्या बाळाचे DNA

अपघाताचं कारण समजणार, DVR अन् ब्लॅकबॉक्सही सापडलं, कशी मिळते माहिती?
