Vaishnavi Hagawane Case : फारार हगवणे पिता-पुत्राला बेड्या, पोलिसांनी असं केलं ट्रॅक, रात्री उशिरा काय-काय घडलं?
वैष्णवी मृत्यू प्रकरणामध्ये राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला अटक झाली आहे. पिंपरी पोलीसांनी रात्री उशिरा स्वारगेट परिसरात ही कारवाई केलेली आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे आता बाबधन पोलीस ठाण्यामध्ये आहेत.
वैष्णवी हगवणे प्रकरणी रात्री उशिरा पिंपरी पोलीसांच्या पथकाकडून अटकेची कारवाई करण्यात आली आहे. फरार काळात हगवणे पिता-पुत्रांनी हॉटेलमध्ये मटणावर ताव मारला. तळेगावतील एका हॉटेलमध्ये मटणावर ताव मारताना सीसीटीव्ही समोर आलाय. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीसांनी आरोपींना ट्रॅक केल्याची माहिती आहे. माहितीच्या आधारे राजेंद्र हगवणे, सुशील हगवणेला स्वारगेट परिसरातून अटक केली. अटकेनंतर दोन्ही आरोपींना पिंपरी- चिंचवड पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयामध्ये आणले. दोन्ही आरोपींना घेऊन आता पोलीस बाबधन पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलंय.
दरम्यान, राजेंद्र हगवणे स्वारगेटमधूनही पळायन करण्याच्या प्रयत्नात होता. वैष्णवी मृत्यू प्रकरणी हगवणे कुटुंबावर 17 मे रोजी गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यावर हगवणे बाबधनच्या मुहूर्त लॉन्जमध्ये लपून बसला होता. पुण्यातून दोघेही कोल्हापूरला गेल्याची माहिती आहे. कोल्हापूरनंतर पुन्हा पुण्यातील पवना डॅम परिसरामध्ये ते दोघेही लपलेले होते. तळेगाव-दाभाडे आणि त्यानंतर स्वारगेटमध्ये हगवणे दिसून आले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

