36 जिल्हे 72 बातम्या | 8.30 AM | 11 June 2021

हवामान खात्याने कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असला तरी शुक्रवारी सकाळपासून कोकणात पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे. | Rain in Maharashtra

भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईसह राज्यातील इतर भागात सकाळपासून पावसानं (Mumbai Rains) हजेरी लावली आहे. हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि कोकण परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबई आणि कोकणमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

त्यानुसार मुंबई आणि उपनगरात अनेक ठिकाणी पहाटेपासून मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. त्यामुळे अंधेरीच्या मिलन सबवेमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मानखुर्द, कुर्ला, सायन, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप आणि मुलूंडमध्ये मुसळधार पाऊस पडताना दिसत आहे.

हवामान खात्याने कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असला तरी शुक्रवारी सकाळपासून कोकणात पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे. सध्या फक्त मुंबईत पहाटेपासून मुसळधार पाऊस (Rain) सुरु आहे. मात्र, कोकण आणि पुण्यात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्याचे चित्र आहे.