36 जिल्हे 72 बातम्या | 10 September 2021
कोकणतला गणेशोत्सव परंपरा आणि संस्कृतीसाठी ओळखला जातो. यावर्षीच्या गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. पण असं असताना सुद्धा गणपतीचा उत्साह कोकणात शिगेला पोहचलाय. लाडके बाप्पा घरात आण्याची वेगळी प्रथा कोकणात पहायला मिळते. कोकणातल्या अनेक ग्रामीण भागात गणरायाला आपल्या डोक्यावर ठेवून त्याला घरी आणण्याची परंपरा आहे.
कोकणतला गणेशोत्सव परंपरा आणि संस्कृतीसाठी ओळखला जातो. यावर्षीच्या गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. पण असं असताना सुद्धा गणपतीचा उत्साह कोकणात शिगेला पोहचलाय. लाडके बाप्पा घरात आण्याची वेगळी प्रथा कोकणात पहायला मिळते. कोकणातल्या अनेक ग्रामीण भागात गणरायाला आपल्या डोक्यावर ठेवून त्याला घरी आणण्याची परंपरा आहे. भाताच्या हिगव्यागार शेतातून हे गणपती घरी आणले जातात. कोरोनाचं संकट आहे मात्र ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचे घरोघरी आगमन झालंय. अनेक खेडे गावात आज गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी अशा पद्धतीने गणरायाला डोक्यावरून आणले जाते. तर काही ठिकाणी गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी डोक्यावरून घरी गणपती आणले जातात. ढोल ताशांच्या गरजात यावर्षी लाडक्या गणरायाला डोक्यावर घेवून घरी आणलं गेलंय.
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

