VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 28 March 2022
शिवसेना संजय राऊत यांनी नवी दिल्लीत विविध विषयांवर भाष्य केलं. खासगीकरणा विरोधातील संप, देवेंद्र फडणवीस, भाजप, महाविकास आघाडीच्या नेत्यांची बदनामी, गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्या यांच्याबद्दल संजय राऊत यांनी भाष्य केलं. सरकारचं धोरण सार्वजनिक उपक्रम विकण्याचं धोरण आहे.
शिवसेना संजय राऊत यांनी नवी दिल्लीत विविध विषयांवर भाष्य केलं. खासगीकरणा विरोधातील संप, देवेंद्र फडणवीस, भाजप, महाविकास आघाडीच्या नेत्यांची बदनामी, गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्या यांच्याबद्दल संजय राऊत यांनी भाष्य केलं. सरकारचं धोरण सार्वजनिक उपक्रम विकण्याचं धोरण आहे. सार्वजनिक उपक्रम विकण्याचं धोरण आहे म्हणजेच देश विकण्याचं धोरण आहे त्याविरोधात संघटना आंदोलन करत आहेत. जोपर्यंत सार्वजनिक उपक्रमांना ताकद दिली जात नाही तोपर्यंत रोजगार वाढणार नाही. गेल्या 50 ते 60 वर्षात सर्वाधिक रोजगार सार्वजनिक उपक्रमांनी दिला आहे. सरकारी उद्योग संपवून दोन पाच खासगी उद्योगांना आपल्या मर्जीतल्या लोकांच्या ताब्यात देश द्यायचा. यानं त्यांची संपत्ती वाढेल. पर्यायानं भाजपची संपत्ती वाढेल, हे धोकादायक आहे, असं संजय राऊत म्हणाले.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?

