VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 16 May 2022
बाबरी मशीद पडली तेव्हा मी अयोध्येतच होतो. तिथे असंख्य भाजपचे कार्यकर्ते होते. पण शिवसैनिक कुठे दिसले नाहीत, असा दावा भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी केला आहे. रावसाहेब दानवे यांच्या या दाव्यातील हवाच शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी काढून घेतली आहे. बाबरी पडली तेव्हा रावसाहेब दानवे अयोध्येला गेले नव्हते. दानवे तेव्हा माझ्यासोबत सिल्लोडला होते, असा दावा अब्दुल सत्तार यांनी केला आहे.
बाबरी मशीद पडली तेव्हा मी अयोध्येतच होतो. तिथे असंख्य भाजपचे कार्यकर्ते होते. पण शिवसैनिक कुठे दिसले नाहीत, असा दावा भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी केला आहे. रावसाहेब दानवे यांच्या या दाव्यातील हवाच शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी काढून घेतली आहे. बाबरी पडली तेव्हा रावसाहेब दानवे अयोध्येला गेले नव्हते. दानवे तेव्हा माझ्यासोबत सिल्लोडला होते, असा दावा अब्दुल सत्तार यांनी केला आहे. त्यामुळे दानवे खरं बोलतात की सत्तार याची जोरदार चर्चा रंगली आहे. तसेच सत्तार यांच्या या दाव्यावर दानवे काय उत्तर देतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावेळी सत्तार यांनी आघाडी सरकार स्थिर असल्याचा दावाही केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे समुद्राप्रमाणे स्थिर आहेत. त्यांची बदनामी कोणी करू नये.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

