Mumbai | मर्चंट नेव्हीत असलेले वरळीतील 5 भारतीय इराणमध्ये अडकले, कुटुंबीय चिंतेत

मर्चंट नेव्हीमध्ये कामाला असलेले वरळीतील 2 मुलांसह 5 भारतीय इराणमध्ये अडकले आहेत. कुटुंबाची आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी या मुलांनी मर्चंट नेव्हीतील नोकरी स्वीकारली.

मर्चंट नेव्हीमध्ये कामाला असलेले वरळीतील 2 मुलांसह 5 भारतीय इराणमध्ये अडकले आहेत. कुटुंबाची आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी या मुलांनी मर्चंट नेव्हीतील नोकरी स्वीकारली. पण ड्रग्स तस्करीच्या एका खोट्या प्रकरणात इराणमध्ये अटक करण्यात आली. या प्रकरणात वरळीतील अनिकेत येनपुर आणि मंदार वरळीकर यांना तिथल्या कोर्टानं निर्दोष मुक्त केलं. मात्र, तरीही त्यांची कागदपत्र त्यांना दिली जात नाहीयेत. अशातच आर्थिक परिस्थिती नसतानाही त्यांच्या पालकांना दिल्लीच्या वाऱ्या कराव्या लागत आहेत. आश्वासनांच्या पलिकडे काहीच हाती लागत नाहीय. या मुलांच्या कुटुंबियांनी पंतप्रधानांना पत्रही लिहिलंय. मात्र, तिथूनही थंड प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे पालक सध्या अस्वस्थ आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI