Kolhapur | कोल्हापूरच्या जोतिबा मंदिरात भाविकांची देवदर्शनासाठी मोठी गर्दी

भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. तसेच ढोल-ताशांच्या गजरामध्ये दख्खनचा राजा जोतिबा यांची घोडे उंट यांच्या यांच्यासमवेत मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी भाविक मोठ्या संख्येने व व्यवस्थापक उपस्थित होते.

कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये असणाऱ्या शारदीय देवी नवरात्र उत्सव च्या पार्श्वभूमीवर दख्खनचा राजा जोतिबा येथे आज महापूजा बांधण्यात आली होती. यावेळी नियमांचे पालन करून ई-पास द्वारे नागरिकांना दर्शन देण्यात येत होते. रोज वीस हजार भाविक दर्शन घेत आहेत. आज चौथ्या दिवशी दख्खनचा राजा ज्योतिबा याची पाच कमळ या रूपातील पूजा बांधण्यात आली आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. तसेच ढोल-ताशांच्या गजरामध्ये दख्खनचा राजा जोतिबा यांची घोडे उंट यांच्या यांच्यासमवेत मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी भाविक मोठ्या संख्येने व व्यवस्थापक उपस्थित होते. आज रविवार ज्योतिबाचा वार असल्यामुळे भाविक दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात ज्योतिबा डोंगरावर दाखल झाले होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI