Lord Krishna | मोठ्या संख्येने भाविक श्रीकृष्ण दर्शनासाठी आले आहेत

त्याचबरोबर भाविक मोठ्या संख्येने भगवान श्रीकृष्णांच्या जन्मस्थानावर दर्शनासाठी आलेले आहेत. लोकांना चांगला आनंद येत आहे. भगवान श्रीकृष्ण दर्शन करून लोकांना आवाहन करत आहे तुम्ही पण दर्शनासाठी या.

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

May 19, 2022 | 8:08 PM

मथुरा : अख्या देशाचे लक्ष हे सध्या ज्ञानवापी मशीद (Gyanvapi mosque)वादाच्या सुनावणीवर लागून राहीलेले आहे. तर देशातील मुस्लिम समाजाचेही या निर्णयावर लक्ष लागलेले असून बाबरीनंतर ज्ञानवापीही जाणार की काय अशी कुजबूज देशात सुरू आहे. तर यावरून एएमआयएम पक्षाचे प्रमुख आणि लोकसभा खासदार असादुद्दीन ओवैसी ही सतत आवाज उठवत आहेत. असे धार्मिक धृविकरणाचे वातावरण देशात सुरू असतानाच आता मथुरा जिल्हा न्यायालयाने श्रीकृष्ण जन्मभूमी– शाहीईदगाह वाद (Shrikrishna Janmabhoomi-Shahi Eidgah controversy) प्रकरणी याचिका रिव्हिजनसाठी दाखल करून घेतली आहे. यामुळे सध्या मथुरेत सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे येथे आलेले भाविक ही याचा क्षणांचा आनंद सांगताना म्हणत आहेत की, कोर्टाने आज हिंदू पक्षकारांची याचिका स्वीकारली आहे. तसेच भाविक (devotees) मोठ्या संख्येने भगवान श्रीकृष्णांच्या जन्मस्थानावर दर्शनासाठी आलेले आहेत लोकांना चांगला आनंद वाटतो आहे. भगवान श्रीकृष्ण दर्शन करून लोकांना आवाहन करत आहे तुम्ही पण दर्शनासाठी या.

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें