Kolhapur | ना IIT, ना ‘मोठी’ डीग्री, कोल्हापूरच्या अमृताला तब्बल 41 लाखांचं पॅकेज!

अमृता कारंडे सध्या कोल्हापूरमधील केआयटी कॉलेजची विद्यार्थिनी आहे. सध्या इंजिनिअरिंगला बरे दिवस नाहीत, असं चित्र संगळीकडं आहे. मात्र, अमृतानं कोणत्याही विषयाचा अभ्यास सकारात्मकपणे आणि सातत्यानं केला की यश आपल्यापासून दूर राहत नाही हे दाखवून दिलं आहे.

कोल्हापूर: राज्यात सध्या कोल्हापूरची अमृता कारंडे चर्चेचा विषय बनली आहे. कोल्हापूरमधील मध्यमवर्गीय कुटुंबातील अमृता राज्यभर चर्चेचा विषय बनण्याचं कारणं नेमकं काय आहे. अमृता कारंडे सध्या कोल्हापूरमधील केआयटी कॉलेजची विद्यार्थिनी आहे. सध्या इंजिनिअरिंगला बरे दिवस नाहीत, असं चित्र संगळीकडं आहे. मात्र, अमृतानं कोणत्याही विषयाचा अभ्यास सकारात्मकपणे आणि सातत्यानं केला की यश आपल्यापासून दूर राहत नाही हे दाखवून दिलं आहे. कोल्हापूरच्या अमृताला जगप्रसिद्ध अडोब कंपनीनं 41 लाखांचं पॅकेज दिलय. अमृताच्या या यशाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI