ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकडे चर्चा!
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील काही खासदार नाराज असल्याच्या चर्चांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. काही खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू असून दिल्लीतील हालचालींना वेग आला आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर नवे राजकीय आव्हान उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी या सर्व चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, अफवांवर विश्वास ठेवू नका. काल झालेल्या बैठकीला सर्व 9 खासदार उपस्थित होते. काही खासदार ऑनलाईन तर काही ऑफलाईन सहभागी झाले होते. पक्षात कोणीही नाराज नसल्याचे त्यांनी सांगितले.
आदित्य ठाकरे म्हणाले, “जो आमच्यासोबत आहे त्यांच्यावर आम्ही पूर्ण विश्वास ठेवतो. पक्षात कोणतीही नाराजी नाही.” दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी 22 जून रोजी शिवालय येथे आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. दुपारी 4 वाजता होणाऱ्या या बैठकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Jun 15, 2026 07:17 PM
मुंबईकरांना दिलासा! पाणीकपातवरील मोठी अपडेट समोर
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...