AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?

Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?

| Updated on: Sep 28, 2026 | 3:22 PM
Share

मुंबईत आयकर विभागाने १२ ठिकाणी छापेमारी केली आहे, ज्यात पॅनोरामा स्टुडिओशी संबंधित ठिकाणांचा समावेश आहे. फिल्म प्रोजेक्ट्सच्या नावाखाली परदेशात कथित रक्कम पाठवणे आणि करचोरीच्या संशयावरुन ही कारवाई झाली. अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि निर्माता वासू भगनानी यांच्याशी संबंधित ठिकाणांवरही सकाळी ६ वाजल्यापासून तपास सुरू आहे.

मुंबईत आयकर विभागाने आज सकाळी १२ ठिकाणी एकाच वेळी छापेमारी सुरू केली आहे. यामध्ये बॉलिवूडमधील दिग्दर्शक आणि अभिनेत्रींशी संबंधित ठिकाणांचा समावेश आहे. फिल्म प्रोजेक्ट्सच्या नावाखाली परदेशात कथित रक्कम पाठवल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि निर्माता वासू भगनानी यांच्याशी संबंधित ठिकाणांवरही आयकर विभागाची पथके पोहोचली आहेत. वांद्रे येथील पाली हिल भागातील पूजा कासा या भगनानी कुटुंबाशी संबंधित इमारतीसमोर आयकर विभागाचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी सकाळी ६ वाजल्यापासून उपस्थित आहेत.

पॅनोरामा स्टुडिओच्या कार्यालयाचाही या छापेमारीत समावेश असल्याची माहिती आहे. करचोरी आणि सिनेमांच्या नावाखाली परदेशात पैसे वळवल्याच्या संशयावरून ही कारवाई सुरू आहे. आयकर विभागाकडून सध्या कागदपत्रे आणि आर्थिक नोंदींची कसून तपासणी केली जात आहे. या तपासणीतून कोणते महत्त्वाचे दस्तऐवज समोर येतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

Published on: Sep 28, 2026 03:22 PM

Follow Us