अब्दुल सत्तार यांच्या पाहणी दौऱ्यावरून शेतकरी आक्रमक, माघारी फिरताच ५० खोक्यांच्या घोषणा; पण का?
VIDEO | अब्दुल सत्तार यांच्या नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील पाहणी दौऱ्यावर शेतकरीच नाराज, काय आहे कारण
नाशिक : राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची वाताहत केल्याचे समोर आले आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसानही झाले आहे. ऐन रब्बी हंगामात अवकाली पावसाने दणका दिल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. अशातच आज सायंकाळी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याच्या नुकसानीचा पाहणी दौरा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला होता. शेतीचे प्रचंड नुकसान झालेले असतानाच अब्दुल सत्तार यांनी रात्रीच्या अंधारात नेमकं काय पाहिलं, असा सवाल शेतकऱ्यांकडूनच केला गेला आहे. कृषीमंत्र्यांनीच गांभीर्याने हा दौरा केला नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आपला रागही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. इतकेच नाही तर दौरा करुन माघारी फिरताच शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत 50 खोके एकदम ओकेच्या घोषणाही दिल्या.

