Abhijit Dipke | 12 वर्षांच्या मुलींचं डोकं फोडलं, कपडे फाडले… दिल्ली पोलिसांवर अभिजित दीपकेंचे गंभीर आरोप
माध्यमांशी संवाद साधताना अभिजित दीपके म्हणाले की, आंदोलनादरम्यान अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवर लाठीचार्ज करण्यात आला. काही अल्पवयीन मुली जखमी झाल्याचा तसेच त्यांच्याशी गैरवर्तन झाल्याचा आरोपही त्यांनी केला. पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांवर अनावश्यक आणि कठोर बळाचा वापर करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
दिल्लीतील आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईवर CJP आंदोलनाचे प्रमुख अभिजित दीपके यांनी गंभीर आरोप केले आहेत. आंदोलनकर्त्यांवर अत्यंत क्रूरपणे कारवाई करण्यात आल्याचा दावा करत त्यांनी दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
माध्यमांशी संवाद साधताना अभिजित दीपके म्हणाले की, आंदोलनादरम्यान अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवर लाठीचार्ज करण्यात आला. काही अल्पवयीन मुली जखमी झाल्याचा तसेच त्यांच्याशी गैरवर्तन झाल्याचा आरोपही त्यांनी केला. पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांवर अनावश्यक आणि कठोर बळाचा वापर करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
दीपके यांनी पुढे आरोप केला की, विद्यार्थ्यांवर होणारा हल्ला थांबवण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी मागे हटण्याचा निर्णय घेतला. सरकारला विद्यार्थ्यांच्या सुरक्षेपेक्षा आंदोलन दडपण्याची अधिक चिंता असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, अभिजित दीपके यांनी केलेल्या या आरोपांबाबत दिल्ली पोलिसांकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. या प्रकरणामुळे आंदोलन आणि पोलिस कारवाईवरून राजकीय तसेच सामाजिक स्तरावर वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Published on: Jul 21, 2026 10:46 AM
12 वर्षांच्या मुलींचं डोकं फोडलं... दिल्ली पोलिसांवर दीपकेंचे आरोप
जालियनवाला बागची आठवण करून देत राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
डायर नाही, कायर पाहिला! लाठीचार्जवर देशपांडेंचा सरकारवर घणाघाती हल्ला
युवा पिढी हीच लोकशाहीची ताकद; CJP आंदोलनाला रितेश-जेनेलियाचा पाठिंबा!